भवानीपूरचा गड ‘ममतां’कडेच! भाजप उमेदवाराचा ५८ हजार मतांनी केला पराभव

मुंबई तक

• 10:12 AM • 03 Oct 2021

विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघातून पराभूत व्हाव्या लागलेल्या ममतांना भवानीपूरने पुन्हा एकदा दणदणीत विजयी केलं. पारंपरिक मतदारसंघ असलेल्या ममतांनी 58 हजार मतांनी भाजप उमेदवाराचा पराभव करत भवानीपूरचा गढ आपलाच असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केला. या विजयाबरोबरच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी ममताचं राहणार असल्याचं निश्चित झालं आहे. विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलेल्या ममता बॅनर्जी पुन्हा एकदा विधानसभेत […]

Mumbaitak
follow google news

विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघातून पराभूत व्हाव्या लागलेल्या ममतांना भवानीपूरने पुन्हा एकदा दणदणीत विजयी केलं. पारंपरिक मतदारसंघ असलेल्या ममतांनी 58 हजार मतांनी भाजप उमेदवाराचा पराभव करत भवानीपूरचा गढ आपलाच असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केला. या विजयाबरोबरच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी ममताचं राहणार असल्याचं निश्चित झालं आहे.

हे वाचलं का?

विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलेल्या ममता बॅनर्जी पुन्हा एकदा विधानसभेत पोहोचल्या. अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेला भवानीपूर पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी आपलं वर्चस्व सिद्ध केलं. भाजपा उमेदवाराचा तब्बल ५८ हजार मतांनी पराभव करत ममतांनी विधानसभेत प्रवेश मिळवला.

भवानीपूर विधानसभा मतदारसंघ हा ममता बॅनर्जींचा पारंपरिक मतदारसंघ आहे. मात्र, यावेळी झालेल्या विधानसभा निवडुकीत त्यांनी दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तिथे त्यांना पराभव स्वीकारावा लागला. मुख्यमंत्री झाल्यानं ममतांना विधानसभेचं सदस्यत्व मिळवणं गरजेचं होतं.

काही महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी आपल्या पारंपरिक मतदारसंघाऐवजी नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत ममतांना पराभवाला सामोरं जावं लागलं. पराभूत झाल्यानंतर ममतांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे सहा महिन्यांच्या आत विधानसभेचं सदस्यत्व मिळवणं आवश्यक होतं.

विधानसभा निवडणुकीची झलक भवानीपूर पोटनिवडणुकीत बघायला मिळाली. तृणमूलबरोबर भाजपने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली. त्यामुळे प्रचारात रंगत आली होती. भाजपने ममता बॅनर्जी यांच्या विरोधात प्रियंका टिबरेवाल यांना मैदानात उतरवलं होतं. प्रचारादरम्यान भाजपकडून विजयाचा दावा केला जात होता. मात्र, ममतांनी मैदान मारलं.

भवानीपूरमध्ये आपलाच दबदबा असल्याचं ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा निकालातून सिद्ध केलं. ममतांनी भाजपा उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांचा तब्बल ५८ हजार मतांनी पराभव केला. या विजयाबरोबर ममतांसाठी विधानसभेचं दार खुलं झालं असून, मुख्यमंत्रीपदी त्याच राहणार असल्यावरही शिक्कामोर्तब झालं.

मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासूनच ममतांनी आघाडी घेतली. तिसऱ्या फेरीनंतर ममतांनी मोठी आघाडी घेतली. त्यानंतर ममतांची लीड वाढतच केली. दहाव्या फेरीअखेर ममता बॅनर्जी ३१ हजार मतांनी आघाडीवर होत्या. २१व्या फेरीनंतर 58 हजार 389 मतांची आघाडी घेत ममतांनी विजय मिळवला. ममता बॅनर्जी यांना 84 हजार 709 मतं मिळाली, तर भाजपच्या उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांना 26 हजार 320 मतं मिळाली. सीपीएमच्या उमेदवाराला 4,201 मतं मिळाली.

भाजपनं पराभव स्वीकारला

पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपनं पराभवाचा स्वीकारला. भाजप उमेदवार प्रियंका टिबरेवाल म्हणाल्या, मी पराभव मान्य करते. मी न्यायालयात जाणार नाही. पण, ते लोक म्हणत होते की, ममता बॅनर्जी एक लाख मतांनी विजयी होतील. त्यांना ५० हजारच मतं मिळाली आहेत. मी ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन करते. मात्र, त्यांनी ज्या पद्धतीने निवडणूक जिंकली आहे, ते लोकांनी पाहिलं आहे’, अशा शब्दात प्रियंका टिबरेवाल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

    follow whatsapp