Manoj Jarange : "मराठ्यांच्या नादी लागू नका, अन्यथा तुमचा कार्यक्रम लावायला वेळ लागणार नाही" असं म्हणत मनोज जरांगे यांनी एकेरी शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिलाय. जालन्यातमध्ये पोलीस प्रशासनाने 9 जणांना तडीपार केलं असून, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाशी संबंधीत असलेले काहीजण आहेत. यावरुन मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आगपाखड केली. आंदोलकांना त्रास द्याल तर तुम्हाला सोडणार नाही असं म्हणत मनोज जरांगे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे पुढे असंही म्हणाले की, माझ्यावर बापावर केस झाली तरी मी बोलणार नाही, मी माझ्या कुटुंबाला विचारत नाही, मग पाहुणे कुठे राहिले...पण मी मराठा आंदोलकांबद्दल मी बोलणार असं जरांगे म्हणाले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Dhananjay Deshmukh : "आरोपींना अभय दिलं नसतं, तर एवढं घडलंच नसतं...", न्यायाची मागणी करत थेट प्रशासनावर नाराजी
मनोज जरांगे यांचा मेहुणा विलास खेडकर, आंदोलनात सहभागी असलेले सुयोग सोळुंके आणि गजानन सोळुंके यांच्यासह एकूण 9 जणांना तडीपार करण्याची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी आपल्या आंदोलनातील लोकांना त्रास देण्याचा हा प्रयत्न असले तर, आम्ही तुम्हाला सोडणार नाही असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.
"...तर तुमचा कार्यक्रम लावायला वेळ लागणार नाही"
हे ही वाचा >> Manoj Jarange यांच्या मेहूण्यावर तडीपारीची कारवाई, कोण आहे विलास खेडकर? वाळू तस्करी, जाळपोळ....
"आधी एक देवेंद्र होता, त्याच्यावर संकट आलं की, तो ब्रम्हदेवाकडे रडत जायचा. पण आता हे देवेंद्र फडणवीस रडत मराठ्यांच्या वाटेवर येतात. पण एकदा गादी मिळाल्यानंतर जी माज आल्यासारखी वागणूक दिसते ती मला आवडत नाही. आम्ही मागचे तीन महिने त्यांच्याबद्दल एक ब्र शब्दही काढला नाही. आम्हाला आशा होती, मराठे म्हणतील तसं फडणवीस करतील. ही आमची गरिबांची भोळीभाबडी भावना होती. पण गरिबांच्या लेकरांच्या भवितव्याशी ते खेळत आहेत. चॅलेंज द्यायचा तर विषय सोडाच, पण शाहणे असाल तर नादाला लागू नका. केसेस कमी करायच्या सोडून केसेस वाढवायला लागलेत. आम्हाला दूखखुळं समजू नका, तुम्ही गोड बोलून डाव टाकतायत असं जर समाजाला कळलं तर हेच मुलं तुम्हाला रस्त्यावर फिरू द्यायचं नाही. एकीकडून सुरेश धस आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगायचं की, गुन्हे मागे घेऊ आणि दुसरीकडे गुन्हे वाढवायचे. दुसरा काही विषय असेल तर आम्हाला घेणं नाही, आमची स्पष्ट भूमिका आहे. पण अंतरवालीतील आंदोलकांना त्रास देणार असाल, तर मी सोडणार नाही. तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ लागणार नाही" असं म्हणत मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिलाय.
तडीपार केलेल्या 9 जणांमध्ये कोणकोण?
दरम्यान, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एकूण 9 जणांना जालना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलंय. वामन मसुरराव तौर, रामदास मसुरराव तौर (दोन्ही रा. शिवनगाव ता. घनसावंगी), संदीप सुखदेव लोहकरे (रा. अंबड), गोरख बबनराव कुरणकर (रा. कुरण), अमोल केशव पंडित (रा. अंकुशनगर), गजानन गणपत सोळुंके, संयोग मधुकर सोळुंके (रा. गोंदी), विलास हरिभाऊ खेडकर (रा. गंधारी) आणि केशव माधव वायभट (रा. अंकुशनगर, ता. अंबड) अशी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या 9 आरोपींची नावं आहेत.
ADVERTISEMENT
