Manoj Jarange Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष होताना दिसत आहे. मनोज जरांगे राज्यभर दौरा करत असताना छगन भुजबळांसह काही ओबीसी नेत्यांनी त्यांच्या मागणीला विरोध केला आहे. त्यावरून नेते विरुद्ध जरांगे अशा शाब्दिक ठिणग्या उडत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या गटातील नेत्यांना तंबी दिल्याची माहिती आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना अजित पवारांना एक आवाहन केलं.
ADVERTISEMENT
झालं असं की, राज्यातील राजकीय-सामाजिक वातावरण वेगवेगळ्या नेत्यांच्या विधानांमुळे दूषित होत असल्याची चिंता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून ओबीसी नेते भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात शाब्दिक संघर्ष पेटला आहे.
हेही वाचा >> ICC New Rule : आता संघाला होणार 5 धावांचा दंड, ICC चा 60 सेकंदाचा नवा नियम काय?
दरम्यान, देवगिरी या शासकीय बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या गटाच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी नेत्यांना सामाजिक वातावरण गढूळ होईल अशी विधान करण्यापासून दूर राहावं, अशी तंबी दिली. याच बैठकीत छगन भुजबळांनी जरांगेंकडून केल्या जाणाऱ्या विधानांचा मुद्दा उपस्थित केल्याची माहिती आहे.
हेही वाचा >> जेठमलानींसमोर ठाकरेंच्या शिवसैनिकाचा मराठी बाणा, सुनावणीतील खडाजंगी जशीच्या तशी…
आमदार-खासदारांना गावबंदी करण्याची मनोज जरांगेंची भूमिका चुकीची असल्याचे मत आमदारांनी अजित पवारांकडे व्यक्त केले. त्याचबरोबर छगन भुजबळ यांच्यावर जरांगेंकडून टीका केली जात आहे. हा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला होता. ते ऐकून घेतल्यानंतर अजित पवारांनी जपून बोला अशी तंबी सर्वांना दिली.
मनोज जरांगे अजित पवारांना काय म्हणाले?
अजित पवारांनी त्यांच्या गटातील आमदारांना वादग्रस्त विधानं करू नये अशी तंबी दिली. त्यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे म्हणाले, “चांगलं केलं. तशीच तंबी देऊन आरक्षण देऊन टाका म्हणावं. मी नाशिकवरूनच घरी जातो. ट्रकभरून फुलं आणि गुलाल घेऊन येतो शहागडला जाऊन. तुमचा सन्मान करण्यासाठी लाखोने मराठे आणतो.”
ADVERTISEMENT