2017 साली मानुषी छिल्लरने मिस वर्ल्डचा खिताब पटकावला होता. त्यानंतर मानुषी छिल्लर कधी बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. तर ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लर यशराजच्या ‘पृथ्वीराज’ फिल्ममध्ये दिसणार आहे. त्यानंतर आता पुन्हा ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ या चित्रपटात मानुषीची वर्णी लागली असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ या सिनेमात मानुषीसोबत विकी कौशल झळकणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ हा एक विनोदी चित्रपट आहे. अभिनेता विकी कौशल पहिल्यांदा विनोदी सिनेमात दिसणार आहे. मानुषी आणि विकी कौशल यांची जोडी पाहण्यासाठी प्रेक्षक मात्र फार उत्सुक आहेत.
‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ या चित्रपटाचं दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य करणार आहे. दरम्यान हा चित्रपट या वर्षी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात एक विचित्र कुटुंब आणि त्यांची गोष्ट दाखवण्यात येणार असून या सिनेमाचं नाव ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ ठेवलं असल्याची चर्चा आहे.
या सिनेमाच्या माध्यमातून विकी आणि मानुषी ही नवी जोडी पहायला मिळणार आहे. दुसरीकडे विकी कौशल शशांक खैतान यांच्या मिस्टर लेले या सिनेमात देखील झळकणार आहे. शिवाय आदित्य धार यांचा ‘अश्वत्थामा’ हा सिनेमाही विकी करणार आहे. इतकंच नव्हे तर विकीने ‘सरदार उधम सिंग’ सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलंय.
ADVERTISEMENT