महाराष्ट्र निर्बंधमुक्त! नव्या आर्थिक वर्षात काय काय नियम बदलले? जाणून घ्या..

मुंबई तक

• 03:03 AM • 01 Apr 2022

महाराष्ट्र आणि देश कोरोनाच्या निर्बंधातून पूर्णपणे मुक्त झाला आहे. मास्कची सक्ती सोडली तर आता देशात आणि राज्यात कोणतेही निर्बंध नाहीत. अशात आजपासून नव्या आर्थिक वर्षालाही सुरूवात झाली आहे. नव्या आर्थिक वर्षात अनेक बदल झाले आहेत. अनेक नियम बदलले आहेत. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यावर त्याचा परिणाम हा होणार आहे. आपण जाणून घेऊ की नेमके काय काय बदल […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्र आणि देश कोरोनाच्या निर्बंधातून पूर्णपणे मुक्त झाला आहे. मास्कची सक्ती सोडली तर आता देशात आणि राज्यात कोणतेही निर्बंध नाहीत. अशात आजपासून नव्या आर्थिक वर्षालाही सुरूवात झाली आहे. नव्या आर्थिक वर्षात अनेक बदल झाले आहेत. अनेक नियम बदलले आहेत. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यावर त्याचा परिणाम हा होणार आहे. आपण जाणून घेऊ की नेमके काय काय बदल झाले आहेत?

हे वाचलं का?

आजपासून महाराष्ट्रातले कोरोनाचे सगळे निर्बंध हटवण्यात आले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्यामुळे कोरोनाशी हात करण्यासाठी लावण्यात आलेले दोन वर्षांचे निर्बंध आता संपुष्टात आले आहेत. गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नववर्षाची सुरूवात २ एप्रिलपासून (शनिवार) होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रापाठोपाठ राज्य सरकारनेही जनतेला मोठा दिलासा दिला आहे.

१ एप्रिलपासून कोरोनाच्या सर्व निर्बंधातून राज्य मुक्त, मार्च २०२० ते मार्च २०२२ या काळात असलेले सगळे निर्बंध अखेर संपुष्टात

गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान ईद दोन वर्षांपूर्वीच्या उत्साहाने साजरी करण्यास कोणतीही आडकाठी नाही

केंद्र सरकारच्या नियमांनुसार मास्कची सक्ती आणि सोशल डिस्टन्सिंग हे नियम मात्र कायम असणार आहेत

महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार मास्क लावणं हे ऐच्छिक असणार आहे

पार्क, जिम, नाट्यगृहं, सिनेमागृहं, मॉल्स आणि इतर सर्व सार्वजनिक ठिकाणांवरच्या उपस्थितीवर संख्येची कोणतीही मर्यादा नाही

लग्न समारंभ, कौटुंबिक सोहळे, सार्वजनिक सोहळे, अंत्यसंस्कार या कार्यक्रमांच्या उपस्थितींवर कोणतीही संख्येची मर्यादा नाही

शैक्षणिक संस्था, महाविद्यालयं यामधल्या उपस्थितीवरही कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही

बस, लोकल आणि रेल्वे तसंच सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करताना लस घेतल्याचं प्रमाणपत्र दाखवण्याची आवश्यकता नाही

सर्व धर्मीयांचे सण, उत्सव यावर कोणतीही मर्यादा नाही, कोणतेही निर्बंध नाहीत. यात्रा, जत्रा, उरूस यावर कोणत्याही प्रकारची बंधनं नाहीत

उद्योग, व्यवसाय, लघू उद्योग यावरही कोणत्याच प्रकारचे निर्बंध नाहीत

आणखी काय काय बदल होणार?

१ एप्रिलपासून अँटीबायोटिक्स, अँटी व्हायरस यांच्यासह अत्यावश्यक औषधांच्या किंमती वाढणार आहेत. पेनकिलर आणि इतर औषधांसाठी १० टक्क्यांपेक्षा जास्त दरवाढ करण्यास संमती देण्यात आली आहे त्यामुळे ८०० हून जास्त औषधांच्या किंमती वाढणार आहेत

१ एप्रिलपासून पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यांन कायद्याच्या कलम ८०इइए अंतर्गत मिळणारा लाभ केंद्र सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे

आजपासून पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, मुदत ठेव खात्यांवरील व्याजेचे पैसे फक्त बचत खात्यात उपलब्ध असतील. पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन व्याजाचे पैसे रोखीने घेण्यावर बंधन

म्युच्युअल फंडामधील गुंतवणुकीचे पैसे चेक, डिमांड ड्राफ्ट किंवा रोखीने देता येणार नाही, त्यासाठी यूपीआय किंवा नेट बँकिंग यांचा वापर करणं बंधनकारक

काही वाहन कंपन्यांनी आजपासून त्यांच्या वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. टाटा मोटर्सने १ एप्रिलपासून आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमती २ ते २.५ टक्क्यांनी वाढवणार असल्याचे म्हटले आहे. मर्सिडीज-बेंझ इंडियाने १ एप्रिलपासून आपल्या वाहनांच्या किमतीत तीन टक्क्यांपर्यंत वाढ करणार असल्याचेही म्हटले आहे. टोयोटा १ एप्रिल २०२२ पासून आपल्या वाहनांच्या किमती ४ टक्क्यांनी वाढवणार आहे. BMW किमती ३.५ टक्क्यांनी वाढवणार आहे.

    follow whatsapp