Bhandara Blast News : भंडाऱ्यात ऑर्डनन्स फॅक्ट्रीमध्ये भीषण स्फोट, दूरपर्पयंतचा परिसरा हादरला...

Bhandara Ordnance Factory Blast: पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ऑर्डनन्स फॅक्ट्रीमध्ये एकूण 14 लोक काम करत होते. हा स्फोट 11 वाजता त्याच वेळी झाला. स्फोट कसा झाला हा तपासाचा विषय आहे, त्याबद्दल स्पष्टता येऊ शकलेली नाही.

Mumbai Tak

मुंबई तक

24 Jan 2025 (अपडेटेड: 24 Jan 2025, 01:45 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

भंडाऱ्यामध्ये ऑर्डनन्स फॅक्ट्रीमध्ये भीषण स्फोट

point

स्फोटामध्ये 4-5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

point

दूरपर्यंत उडाले स्फोट झालेल्या भागातील अवेशष

Bhandara News : भंडाऱ्यातील जवाहरनगरमध्ये ऑर्डनन्स फॅक्टरीत भीषण स्फोट झाला. या स्फोटानं आजूबाजूचा परिसर अक्षरश: हादरला आहे. कारखान्याच्या आरके चार्ज विभागात हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आरडीएक्सच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या साबुदाण्यासारख्या कच्च्या मालाने स्फोट घेतल्यानं ही घटना झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. या घटनेत 5 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >>Jitendra Awhad : आव्हाडांनी काढलं नवं प्रकरण, महादेव गित्तेचा दवाखान्यातील व्हिडीओ, निशाण्यावर कोण?

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, डिफेन्स फॅक्ट्रीमध्ये एकूण 14 लोक काम करत होते. हा स्फोट 11 वाजता त्याच वेळी झाला. स्फोट कसा झाला हा तपासाचा विषय आहे, त्याबद्दल स्पष्टता येऊ शकलेली नाही. 4 ते 5 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. उर्वरित लोकांना वाचवण्याचं काम सुरू आहे.

    follow whatsapp