कराड जवळच्या मलकापुर शहरातील एका फर्निचर शोरूमला आग लागली. आज दुपारी एक वाजताच्या सुमारास ही आग लागली असल्याची माहिती आहे. पुणे बंगळूर आशियाई महामार्गला लागून असलेल्या लोटस शोरूमला ही आग लागली. मुख्य म्हणजे यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
ADVERTISEMENT
काही वेळातच या शोरूममधून धुराचे लोट बाहेर पडू लागले. काही वेळातच धूराचे लोट मोठ्या प्रमाणात दिसू लागल्यानंतर नागरिकांना या घटनेची माहिती मिळाली. नागरिकांनी तातडीने या घटनेची माहिती त्यांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली.
आग लागताच महामार्गासह परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. आकाशात उंचीपर्यंत धुराचे लोट पसरले होते. दरम्यान या आगीत कोट्यवधी मालमत्तेचं नुकसान झालं आहे. ही आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
ADVERTISEMENT