मी आणि समीर वानखेडे जन्माने हिंदूच आहोत. आम्ही धर्म बदललेला नाही असं ट्विट आता समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने केलं आहे. समीर वानखेडे यांच्यावर रविवारपासून आरोप केले जात आहेत कारण NCB ने जे साक्षीदार आर्यन खान प्रकरणात समोर आणले होते त्यातला एक साक्षीदार प्रभाकर साईल याने मीडियासमोर येऊन आरोप केले आहेत.
ADVERTISEMENT
एवढंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही व्यक्तीगत पातळीवर समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. एवढंच नाही तर त्यांनी समीर वानखडे यांचा उल्लेख समीर दाऊद वानखेडे असा केला आहे. कालपासून सातत्याने नवाब मलिक हे समीर वानखेडेंचा उल्लेख समीर दाऊद वानखेडे असा करत आहेत. त्यानंतर आता क्रांती रेडकरने एक ट्विट करून मी आणि समीर जन्माने हिंदूच आहोत असं म्हटलं आहे.
काय आहे क्रांती रेडकरचं ट्विट?
मी आणि माझे पती समीर वानखेडे जन्माने हिंदूच आहोत. आम्हाला सर्व धर्मांविषयी आदर आहे. आम्ही आमचा धर्म बदलला नाही. समीरचे वडीलही हिंदूच आहेत. तसंच माझ्या सासूबाई मुस्लिम होत्या. त्या आता हयात नाहीत. समीर वानखेडे यांचं पहिलं लग्न विशेष विवाह कायद्याच्या अंतर्गत झालं होतं. समीर आणि त्याच्या पहिल्या पत्नीचा डिव्होर्स 2016 मध्ये झाला. मी आणि समीरने 2017 मध्ये लग्न केलं. या आशयाचं ट्विट क्रांती रेडकरने केलं आहे.
नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना समीर वानखेडे यांनीही उत्तर दिलं आहे…
महाराष्ट्र सरकारमधील माननीय अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी माझ्याशी संबंधित काही दस्तऐवज त्यांच्या ट्विटर हँडल वर प्रकाशित केले आहेत ज्यात “समीर दाऊद वानखेडे असं नाव घेत ‘फर्जीवडा हुआ’ असे सांगितले गेले आहे, असं म्हटलंय.
याच संदर्भात मी सांगू इच्छितो की माझे वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे 30 जून 2007 रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून निवृत्त झाले. माझे वडील हिंदू आणि माझी आई स्वर्गीय श्रीमती झहीदा मुस्लिम होत्या. मी भारतीय परंपरेतील एक संमिश्र, बहुधर्मीय आणि धर्मनिरपेक्ष कुटुंबातील आहे आणि मला माझ्या कुटुंबाचा आणि कुटुंबातील प्रत्येक परंपरेचा अभिमान आहे,
ADVERTISEMENT