‘भारत जोडो’ यात्रेच्याच दिवशी पक्ष का सोडला? देवरांनी सांगितली राजीनाम्याची Inside Story

प्रशांत गोमाणे

• 02:36 PM • 16 Jan 2024

काँग्रेस सोडण्यापूर्वी तुम्हाला रोखण्यासाठी पक्षातून कुणाचा फोन आला होता का? असा सवाल देवरा यांना या मुलाखतीत विचारण्यात आला होता. यावर देवरा यांनी सांगितले, मला थांबवण्याचा अजिबात प्रयत्न झाला नाही आणि कोणत्याही नेत्याचा मला फोन देखील आला नसल्याचा खुलासा देवरा यांनी केला आहे.

milind deora tell congress resignation inside story rahul gandhi nyay jodo yatra join eknath shinde shivsena maharashtra politics

milind deora tell congress resignation inside story rahul gandhi nyay jodo yatra join eknath shinde shivsena maharashtra politics

follow google news

Milind Deora Resignation Inside Story : माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसची साथ सोडून शिवसनेचा (शिंदे गट) धनुष्यबाण हाती घेतला आहे. देवरा यांच्या राजीनाम्याने काँग्रेसला आधीच धक्का बसला असताना, त्यात देवरांच्या (Milind Deora)  शिंदे गटातील प्रवेशाच्या टायमिंगने देखील काँग्रेसची अडचण झाली. कारण ज्या दिवशी देवरा शिंदे गटात प्रवेश करणार होते, त्याच दिवशी राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला प्रारंभ होणार होता. त्यामुळे देवरा यांच्या या टायमिंगवरून राजकारण चांगलेच पेटले होते. आता हे टायमिंग देवरा यांनी कसं साधलं? या रणनीती मागे कुणाचा हात होता? याबाबत खळबळजनक खुलासा देवरा यांनी केला आहे. (milind deora tell congress resignation inside story rahul gandhi nyay jodo yatra join eknath shinde shivsena maharashtra politics)

हे वाचलं का?

काँग्रेस सोडून शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मिलिंद देवरा यांनी द इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत देवरा यांनी त्यांच्या राजीनाम्याबाबत खळबळजनक खुलासे केले आहेत. काँग्रेस सोडण्यापूर्वी तुम्हाला रोखण्यासाठी पक्षातून कुणाचा फोन आला होता का? असा सवाल देवरा यांना या मुलाखतीत विचारण्यात आला होता. यावर देवरा यांनी सांगितले, मला थांबवण्याचा अजिबात प्रयत्न झाला नाही आणि कोणत्याही नेत्याचा मला फोन देखील आला नसल्याचा खुलासा देवरा यांनी केला आहे.

हे ही वाचा :Shiv Sena UBT: ‘शिंदे, नार्वेकरांना माझं खुलं आव्हान सुरक्षा न घेता या आणि…’, उद्धव ठाकरेंचं थेट आव्हान

‘त्या’ फोन कॉलबाबत काय म्हणाले?

मला पक्षातील एका वरिष्ठ नेत्याचा फोन आला होता. त्या नेत्याने मला पक्ष सोडून जाऊ नये, अशी कोणतीच विनंती केली नाही. याउलट मला फोनवर फक्त इतकचं सांगितलं, राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या दिवशी पक्ष सोडण्याची घोषणा करू नका. वरिष्ठ नेत्याचे हे बोल एकूण मला खूपच राग आला आणि काँग्रेस सोबत वेगळे होण्याची माझी इच्छा आणखीण प्रबळ झाली, असे देवरा यांनी यावेळी सांगितले.

मिलिंद देवरा यांच्या पक्ष सोडण्याच्या घोषणेची वेळ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती,अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. देवरासोबत माझं फोनवर बोलणे झाले होते. आणि मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या दाव्याबाबत राहुल गांधीशी बोलू इच्छित असल्याचे त्यांनी सांगितले होते, असे काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश म्हणाले आहेत.

हे ही वाचा :Sharad Pawar : “आता भाजप आणि आरएसएस याचा मतांसाठी…”, पवार स्पष्टच बोलले

मिलिंद देवरा काय म्हणाले?

गेल्या 10 वर्षात मुंबईत एकही आतंकवादी हल्ला झाला नाही. यामागचं संपूर्ण श्रेय नरेंद्र मोदींना जाते, अशी स्तुतीसुमने मिलिंद देवरा यांनी उधळली होती. माझी साथ देणाऱ्यांचे आभार. हा माझासाठी सोप्पा मार्ग नव्हता. आता एकदा पुन्हा मुंबईला आर्थिक राजधानी बनवायचे आहे. फायनान्सच्या बाबतीत मुंबईला पुन्हा एकदा मजबूत करायचे आहे. आणि ही खूप गर्वाची गोष्ट आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत खूप सशक्त झाला आहे, असे देखील देवरा यांनी सांगितले.

    follow whatsapp