अभिनेते विक्रम गोखले यांनाही कंगनाप्रमाणे पद्मश्री पुरस्कार मिळवायचा आहे ते दिसतं आहे त्यामुळेच ते तिच्या वक्तव्याला पाठिंबा द्यावासा वाटला असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे. कंगनाला मिळणारं संरक्षण आणि पद्मश्री पुरस्कार पाहून त्यांच्याही मनात पद्मश्री मिळवण्याची इच्छा निर्माण झालेली दिसते असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
कंगना रणौत असं म्हणाली होती भारताला 1947 ला जे मिळालं ते स्वातंत्र्य नव्हतं तर ती भीक होती. आपल्याला खरं स्वातंत्र्य मिळालं ते 2014 ला. तिच्या या वक्तव्याला विक्रम गोखलेंनी पाठिंबा दिला. कंगना बोलली ते योग्यच आहे असं ते म्हणाले होते. त्यावरून आता थोरात यांनी विक्रम गोखलेंना सुनावलं आहे.
काय म्हणाले बाळासाहेब थोरात?
अभिनेत्री कंगना रणौत, अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर आणि भाजपवर आज बाळासाहेब थोरात यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं. ‘कंगना म्हणते 1947 ला जे स्वातंत्र्य मिळालं ती भीक होती. 2014 ला देशाला खरं स्वातंत्र्य मिळालं. कसलं स्वातंत्र्य मिळालं? हे बोलणं वेडेपणाचं आहे. त्यावर बोलण्यात अर्थ नाही.
कुणीतरी बोलायचं मग लगेच त्यांना संरक्षम मिळतं. 40-40 बॉडीगार्ड उभे राहतात. जो कुणी वादग्रस्त बोलला आहे त्याला त्रास होऊ नये म्हणून संरक्षण पुरवलं जातं. पुढे लगेच पद्मश्री मिळतो. हे पाहिल्यानंतर विक्रम गोखले नावाचे गृहस्थ बोलायला लागले. त्यांनाही पद्मश्री व्हायचं आहे असंही दिसतं. याचा अर्थ कसंही बोला, कसंही वागा ते चालतं’ असा घेतला जातो अशी टीका थोरात यांनी केली.
‘2014 पासूनच देशाला खरं स्वातंत्र्य मिळालं, मी माझ्या मतावर आजही ठाम’, विक्रम गोखले पुन्हा तेच म्हणाले
आज स्वातंत्र्यावर बोलले. स्वातंत्र्य चळवळीवर बोलले. स्वातंत्र्य बोगस असल्याचं विधान केलं. उद्या ते राज्यघटनेवरही बोलतील. आता म्हणतील राज्यघटना बोगस आहे. गरीबांना मतांचा अधिकार नको. कशाला हवा त्यांना मतांचा अधिकार. त्यांची दिशा पाहा, सर्व तुमच्या लक्षात येईल. हे बोलणं सहज नसतं. कोणी तरी मेंदू यामागे काम करत असतो, असा दावा त्यांनी केला.
हळूहळू ते आपल्या राज्यघटनेवर येऊन पोहोचले तर आश्चर्य मानण्याचं कारण नाही. जेव्हा ते राज्यघटनेवर येतील तेव्हा आपण जे कष्टाने मिळवलं ते सर्व गमावून बसू. नागरिकत्वाच्या तपासण्या अमूकतमूक हे विषय त्यांनी हातात घेतले होतेच. आता नव्या पद्धतीने ते समोर येत आहेत. धर्माचे नाव घेतल्यावर लोक मतदान करतात हे त्यांच्या पक्कं लक्षात आहे. मतं घ्यायचे आणि वाटेल तसं वागायचं हे चालू आहे. एकट्याचीच सत्ता आणायची. बाकी कोणी नको हे सुरू आहे. पण हा देश राज्यघटनेनुसारच चालवावा लागेल हे लक्षात ठेवा, असा इशारा त्यांनी दिला.
ADVERTISEMENT