पुणे : चिमुकलीवर बलात्कार करून खून; आरोपीला फाशी, एका वर्षातच न्यायालयाने दिला निकाल

मुंबई तक

• 06:26 AM • 02 Mar 2022

दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण करुन बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी एका आरोपीला पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील पानशेतजवळ एका गावात वर्षभरापूर्वी ही दुर्दैवी घटना घडली होती. घटनेला १ वर्ष होण्याच्या आत न्यायालयाकडून आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. शिवाजीनगर न्यायालयाचे जिल्हा सत्र न्यायाधीश एस. ए. देशमुख यांनी हा निर्णय दिला. संजय बबन […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण करुन बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी एका आरोपीला पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील पानशेतजवळ एका गावात वर्षभरापूर्वी ही दुर्दैवी घटना घडली होती. घटनेला १ वर्ष होण्याच्या आत न्यायालयाकडून आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. शिवाजीनगर न्यायालयाचे जिल्हा सत्र न्यायाधीश एस. ए. देशमुख यांनी हा निर्णय दिला.

हे वाचलं का?

संजय बबन काटकर असे या प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. काटकर याने १५ फेब्रुवारी २०२१ रोजी घरासमोर खेळत असलेल्या दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण केलं होतं. याप्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी वेल्हा पोलिसांनी शोधमोहीम सुरू केल्यानंतर १६ फेब्रुवारी २०२१ रोजी पोलिसांना हवेली तालुक्यातील मालखेड थोपटेवाडी रोडवर एका सिमेंट पाईपमध्ये मुलीचा मृतदेह सापडला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी घरासमोर खेळत असताना आरोपी संजय बबन काटकर याने तिचे अपहरण केले. अपहरणानंतर मुलीला रिक्षात बसवून पानशेत रोडवरील मालखेड येथे नेण्यात आलं. तेथे मुलीवर सिमेंटच्या पाईपमध्ये बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती.

दरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपीचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल केले होते. सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यानंतर आरोपी संजय रायगड जिल्ह्यातून पळून गेला होता, मात्र पोलिसांच्या खबऱ्यांनी माहिती दिल्यानंतर वेल्हे पोलिसांचे पथक घटनास्थळी गेले होते.

त्यावेळी वरंधा घाट वाहतुकीसाठी बंद असल्यानं १० ते १२ किलोमीटर अंतर पायी जावून रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील नाटे गावातील एका वीटभट्टीवरून वेल्हा पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन हे प्रकरण जलद न्यायालयात चालविण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती.

शिवाजीनगर सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर वर्षभरातच आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी ‘मुंबई Tak’शी बोलताना आरोपीला १ वर्षाच्या आत फाशीची शिक्षा सुनावल्यानं न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केलं. पोलिसांनी केलेल्या कामाचा अभिमान वाटत असल्याचं त्यांनी म्हटले आहे. या खटल्यात एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले.

    follow whatsapp