Congress आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर जीवघेणा हल्ला; कुठे घडली घटना?

मुंबई तक

09 Feb 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:05 AM)

Attack on mlc Pradnya Satav : हिंगोली : काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आणि काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र या हल्ल्यातून त्या सुखरुप बचावल्या आहेत. आमदार प्रज्ञा सातव यांनी स्वतः याबाबत ट्विट करुन माहिती दिली. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील ‘कसबे धवंडा’ गावात असताना हा हल्ला […]

Mumbaitak
follow google news

Attack on mlc Pradnya Satav :

हे वाचलं का?

हिंगोली : काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आणि काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र या हल्ल्यातून त्या सुखरुप बचावल्या आहेत. आमदार प्रज्ञा सातव यांनी स्वतः याबाबत ट्विट करुन माहिती दिली. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील ‘कसबे धवंडा’ गावात असताना हा हल्ला झालेला आहे. सातव यांच्या तक्रारीनंतर या हल्लेखोरावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यामागचं नेमकं कारण काय अद्याप अस्पष्ट आहे. (MLC Pradnya Satav brutally attacked at Kasbe Dhawanda Village Kalamnur)

आमदार सातव यांनी ट्विट करुन सांगितलं की, “कळमनुरीमधील कसबे धवंडा या गावात आज माझ्यावर अमानुष हल्ला झाला. एका अज्ञात व्यक्तीने माझ्यावर मागून हल्ला केला. मला जखमी करण्याचा हा गंभीर प्रयत्न होता आणि माझ्या जीवाला धोका आहे. महिला आमदारावर झालेला हल्ला हा लोकशाहीवर हल्ला आहे. समोरून लढा भ्याड होऊ नका, असं त्या म्हणाल्या. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाल्याचं म्हटलं आहे.

Valentine day : गायीला मिठी मारुन साजरा करा यंदाचा व्हॅलेंटाईन डे; कोणी केली मागणी?

दरम्यान, माध्यमांशी बोलताना प्रज्ञा सातव म्हणाल्या, आज रात्री ८ वाजता ‘कसबे दवंडा’ या गावी असताना एक अज्ञात व्यक्ती माझ्या गाडीजवळ आला. त्यामुळे मी पटकन गाडीत बसली आणि दार लावून घेतलं. नंतर माझ्या बॉडिगार्डने त्याला बाजूला केलं. त्यामुळी मी उतरुन नियोजित कार्यक्रमाला गेली आणि इतरांशी बोलू लागली. पण तेव्हा हा इसम मागून आला आणि त्यानं ओढून माझ्यावर हल्ला केला. समोर असलेल्या लोकांनी या व्यक्तीला पकडलं आणि त्याला पोलिसांच्या हवाली केलं.

‘ही मोठी गंभीर बाब’ : सुप्रिया सुळे

दरम्यान, या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन आमदार सातव यांना सुरक्षा पुरविण्याची मागणी केली आहे. “विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा राजीव सातव यांच्यावर कसबे धवंडा, ता. कळमनुरी येथे झालेला हल्ला ही मोठी गंभीर बाब आहे. एका महिला लोकप्रतिनिधींवर अशा प्रकारे हल्ला होतो हे खेदजनक आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

    follow whatsapp