मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर राज ठाकरे यांच्या मनसेने ठाण्यात आनंद दिघे यांचा पुर्णाकृती पुतळा उभारावा अशी मागणी केली आहे.
ADVERTISEMENT
मनसेने ठाण्याचे महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांच्याकडे यासाठीचे निवेदन देण्यात आले आहे. ठाणे शहराचा मुख्य चौक असणाऱ्या चिंतामणी चौकात हा पुतळा उभारण्यात यावा अशी मनसेची मागणी आहे.
मनसेने ज्यांचा पुतळा उभारावा ही मागणी केली आहे ते आनंद दिघे कोण होते ?
1966 मध्ये मुंबईत शिवसेनेची स्थापन झाल्यानंतर मुंबईत बाहेर शिवसेना रुजवण्यात ज्यांनी महत्वाची भूमिका बजावली त्यात आनंद दिघे हे शिवसेनेचे मुख्य शिलेदार होते. मुंबईच्या शेजारीच असलेला ठाणे जिल्हात शिवसेना आनंद दिघे यांनी शिवसेना केवळ रुजवली नाही तर ठाणे आजतागायत सेनेचा बालेकिल्ला समजला जातो. ठाणे आणि आनंद दिघे हे समीकरण घट्ट आहे.
आनंद दिघे, त्यांची कार्यशैली जितकी वादग्रस्त होती तितकाच वादग्रस्त अपघाती मृत्यू ठरला
आनंद दिघे यांचा जन्म 27 जानेवारी 1952 आणि मृत्यू झाला तो 26 ऑगस्ट 2001 ला. अवघ्या 50 वर्षाच्या आयुष्यात आनंद दिघे हे लोकप्रियतेच्या शिखरावर पोचले होते.
आनंद दिघे यांच्या पक्षकामाकडे एक नजर टाकली तर असं दिसतं की दिघेंना राजकीय महत्वकांक्षाही नव्हती. शिवसेनेत काम सुरु केल्यानंतर त्यांच्याकडे ठाणे जिल्हा प्रमुखपद आले आणि मृत्युपर्यंत दिघे याच पदावर होते.
सुरुवातीच्या काळात आनंद दिघेनी कल्याणमधल्या हाजी मलंगचे केलेले आंदोलन गाजले होते. दिघेंनी ठाण्यात त्यांना सगळ्यात आधी नवरात्र उत्सव आणि दहिहंडीचा उत्सव सुरु केला.
ठाण्याच्या टेंभी नाका परिसरात आनंद दिघेंच्या जनता दरबार भरत असे. या जनता दरबारात स्वतःची गाऱ्हाणी घेऊन येणारा कधीच माघारी जात नसे अशी त्यांची ख्याती होती.
आनंद दिघेंचे नाव 1989 च्या ठाण्याच्या श्रीधर खोपकर हत्याकांड प्रकरणात गाजले होते. शिवसेनेचा महापौर निवडणुकीत पराभव झाला आणि या पराभवासाठी नगरसेवक श्रीधर खोपकर यांना दोषी मानण्यात आले. महिनाभरातच खोपकर यांचा मर्डर झाला. आनंद दिघेंना खोपकर प्रकरणात टाडा कायद्याखाली अटक करण्य़ात आली होती आणि ही केस त्यांच्या मृत्यपर्यंत सुरुच होती
सेना-भाजपाची य़ुती असताना ठाण्याची जागा ही भाजपाकडे असताना आनंद दिघेंमुळे प्रमोद महाजन यांनी शिवसेनेसाठी सोडली आणि भाजपाच्या राम कापसे यांनी या जागेवर पाणी सोडावे लागले.
ठाणे महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना आनंद दिघेंनी स्वत:च्याच पक्षातील नगरसेवकांविरोधात आरोप केला. “ठाणे महापालिकेत 41 टक्के भ्रष्टाचार चालतो. ठाण्यामध्ये पालिकेचे ठेके देताना टक्केवारी कमिशन नगरसेवक खातात,” असा त्यांचा आरोप होता.
दिघेंची लोकप्रियती इतकी वाढली होती की त्यांना प्रति बाळ ठाकरे म्हणून ओळखले जाऊ लागले होते. शिवसैनिकांच्या मनात जे स्थान मातोश्रीचे होते तसचे आदराचे स्थान आनंद दिघेंच्या टेंभी नाक्याच्या कार्यालयाचे होते.
24 ऑगस्ट 2001 गणपतीचे दिवस होते आणि ठाण्यातला वंदना टॉकीजजवळ दिघेंच्या गाडीला अपघात झाला. त्यांना सिंघानिया हॉस्पिटलमध्ये अँडमीट करण्यात आले. त्यातच त्यांनी ह्रद्यविकाराचा अँटक आला त्यात त्य़ांचे निधन झाले.
त्यांच्य़ा मृत्यनंतर 200 खाटांचे रुग्णालय आख्खे जाळून टाकण्यात आले होते.
आनंद दिघेंच्या मृत्यूची घोषणा ही उध्दव ठाकरेंनीच केली होती.
नारायण राणेंच्या मुलाने निलेश राणेने ‘शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या हत्येसाठी बाळासाहेब ठाकरे जबाबदार होते असे विधान केले होते यावरुनही मोठा वाद उसळला होता.
आज आनंद दिघेंच्या मृत्यनंतर 20 वर्षानंतरही ठाण्यात शिवसेनेची सत्ता अबाधित आहे हीच आनंद दिघेंची ओळख आहे.
आणि मनसेने आता याच आनंद दिघेंचा पुतळा उभारण्याची मागणी केली आहे.
ADVERTISEMENT