Mumbai: मोठी बातमी… मनसे नेते संदीप देशपांडेंवर प्राणघातक हल्ला

मुंबई तक

02 Mar 2023 (अपडेटेड: 26 Mar 2023, 05:10 PM)

MNS leader Sandeep Deshpande was assaulted by 4 assailants in Shivaji Park: मुंबई: मनसे (MNS) सरचिटणीस संदीप देशपांडे (Sadndeep Deshpande) यांच्यावर प्राणघातक हल्ला (attack) करण्यात आल्याची धक्कादायक वृत्त नुकतंच हाती आलं आहे. दादरमधील (Dadar) शिवाजी पार्क (Shivaji Park) परिसरात अज्ञातांनी देशपांडेंवर हल्ला केल्याचं समोर आलं आहे. संदीप देशपांडे मॉर्निंग वॉकसाठी शिवाजी पार्कमध्ये गेलेले असताना त्यांच्यावर […]

Mumbaitak
follow google news

MNS leader Sandeep Deshpande was assaulted by 4 assailants in Shivaji Park: मुंबई: मनसे (MNS) सरचिटणीस संदीप देशपांडे (Sadndeep Deshpande) यांच्यावर प्राणघातक हल्ला (attack) करण्यात आल्याची धक्कादायक वृत्त नुकतंच हाती आलं आहे. दादरमधील (Dadar) शिवाजी पार्क (Shivaji Park) परिसरात अज्ञातांनी देशपांडेंवर हल्ला केल्याचं समोर आलं आहे. संदीप देशपांडे मॉर्निंग वॉकसाठी शिवाजी पार्कमध्ये गेलेले असताना त्यांच्यावर स्टंप आणि लोखंडी रॉडने हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर संदीप देशपांडे यांना तात्काळ हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital) दाखल करण्यात आलं आहेत. दुसरीकडे याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, संदीप देशपांडेंवर हल्ला झाल्याचं वृत्त समजताच अनेक मनसे नेत्यांनी हिंदुजा रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली आहे. (mns leader sandeep deshpande who had gone for morning walk in shivaji park dadar was attacked by 4 assailants)

हे वाचलं का?

नेमकी घटना काय

मनसे नेते संदीप देशपांडे हे नेहमीप्रमाणे आजही (3 मार्च) शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉकला गेलेले असताना चार अज्ञात हल्लेखोरांनी जे तोंडावर मास्क लावून आले होते त्यांनी स्टम्पने अचानक देशपांडेंवर हल्ला केला. या हल्ल्यात देशपांडेंच्या हात आणि पायाला दुखापत झाली आहे. हल्लोखोरांना देशपांडेंना गंभीर दुखापत पोहचवायची होती. मात्र, सुदैवाने देशपांडे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले नाही.

संदीप देशपांडेंवर हल्ला होताच येथील अनेक नागरिक त्यांच्या बचावासाठी पुढे सरसावले. त्यामुळे चारही हल्लेखोरांनी लागलीच येथून पळ काढला. मिळालेल्या माहितीनुसार हे चारही हल्लेखोर सध्या फरार झाले असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

मनसेच्या निशाण्यावर उद्धव ठाकरे; संदीप देशपांडेंनी उल्लेख केलेले ‘साहेब’ कोण?

खरं तर शिवाजी पार्क हा संपूर्ण भाग सकाळच्या सुमारास प्रचंड वर्दळीचा असतो. येथे मोठ्या प्रमाणात लोकं मैदानावर खेळण्यासाठी आणि मॉर्निंग वॉकसाठी येत असतात. असं असतानाही हल्लेखोरांनी देशपांडेंवर एवढ्या खुलेपणाने हल्ला केलाच कसा असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

Sandeep Deshpande : संदीप देशपांडे राज ठाकरेंच्या घराबाहेरुन का पळून गेले?

देशपांडेंवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मनसे नेते संतोष धुरींची प्रतिक्रिया

दरम्यान, या हल्ल्यानंतर मनसे नेते संतोष धुरी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, ‘हल्ला कोणी केला.. काय केला हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. ते कळेलच आम्हाला.. त्याच शोध आम्हीच लावू. आता कशाकरता हल्ला झाला हे अद्याप माहिती नाही. किंवा कोणी हल्ला केलाय ते पण माहिती नाही. पूर्णपणे भ्याड हल्ला होता. तोंडावर मास्क वैगरे लावून असा हल्ला केला होता. एकटा माणूस पाहून हा हल्ला केला होता.’

‘संदीपची प्रकृती नॉर्मल आहे. त्याने तो हल्ला परतवून लावला एकटा असला तरी.. आमचा मनसैनिक आहे तो.. हातावर स्टम्पचा वार घेतला आणि एक फटका त्याच्या पायावर बसला.’

‘प्रत्यक्षदर्शींच्या मते, 3-4 लोकं हे तोंडाला मास्क लावून बसून होते. जसं संदीप हा मॉर्निंग वॉकला आलेला पाहताच त्यांनी त्याच्यावर थेट हल्ला चढवला. रोज त्याच्यासोबत 3-4 लोकं असतात पण आज तो एकटाच होता. तेच पाहून हा हल्ला केला गेला. हा पूर्वनियोजित असाच हल्ला होता.’ असं संतोष धुरी यावेळी म्हणाले.

    follow whatsapp