जगभरात कोरोनाने जो काही हाहाकार दीड ते दोन वर्षे माजवला तो सगळ्यांनीच पाहिला आहे. ती दहशत संपत नाही तोच आता मंकीपॉक्स (Monkeypox) या नव्या रोगाने दहशत वाढवली आहे. मंकीपॉक्सच्या रूग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. जगातल्या अनेक देशांमध्ये मंकीपॉक्स (Monkeypox) रूग्ण आढळले आहेत.
ADVERTISEMENT
WHO अर्थात जागतिक आरोग्य संस्थेने सांगितल्यानुसार मंकीपॉक्स हा विषाणूजन्य जुनोटिक रोग आहे. याचे विषाणू प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरतात. सध्या भारतात मंकीपॉक्सचा एकही रूग्ण आढळलेला नाही. मात्र इतर देशांमध्ये या रोगाची प्रकरणं वाढत आहेत. त्यामुळे मोदी सरकारने भारतातील सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्राने दिलेल्या सूचनेनंतर आता महाराष्ट्र सरकारनेही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
महाराष्ट्र सरकारची मंकीपॉक्स संदर्भात काय आहे अॅडव्हायजरी?
मागच्या २१ दिवसात मंकीपॉक्स प्रभावित देशांमधे प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर बारकाईने लक्ष ठेवलं जातं आहे.
या संशयित रुग्णांची माहिती स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीने आरोग्य विभागाला देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या रुग्णांवर उपचार करताना सर्व संसर्ग नियंत्रण पद्धती पाळल्या गेल्या पाहिजेत
रिपोर्ट सकारात्मक आला तर हा रूग्ण किती लोकांच्या संपर्कात आला आहे हे तपासलं जाील
रक्ताची थुंकी तसंच इतर नमुने एनआयव्ही पुणे या ठिकाणी पाठवले जातील
गेल्या २१ दिवसांमध्ये संपर्कात आलेल्या रूग्णांना तातडीने ओळखून क्वारंटाईन करावं लागेल
या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.
मंकी पॉक्स या रोगाची लक्षणं काय आहेत?
मंकीपॉक्स हा दुर्मिळ विषाणू आहे. ताप आलेल्या व्यक्तींमध्ये जी लक्षणं दिसतात साधारण तीच लक्षणं या रोगाच्या व्यक्तींमध्ये आढळून येतात. यामध्ये संक्रमित व्यक्तीच्या चेहऱ्यावर पुरळ दिसू लागतात. तसंच स्नायू दुखणं, थंडी वाजून येणं, थकवा येणं या सगळ्या गोष्टीही जाणवतात.
मंकीपॉक्स या रोगाने संक्रमित असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात कुणी आलं तर त्यांना हा रोग होऊ शकतो. मंकीपॉक्सचा विषाणू त्वचा, श्वसनमार्ग आणि डोळे तसंच नाक यातून आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. संक्रमित प्राणीही या रोगाचे वाहक असण्याची चिन्हं आहेत.
ADVERTISEMENT