महाराष्ट्रात दिवसभरात 10 हजार 812 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आत्तापर्यंत राज्यात एकूण 58 लाख 925 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 95.99 टक्के इतका झाला आहे. दिवसभरात राज्यात 6 हजार 627 नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात दिवसभरात 101 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.1 टक्के इतका झाला. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 12 लाख 8 हजार 361 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60 लाख 43 हजार 548 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 15 हजार 839 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 4 हजार 245 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज रोजी एकूण 1,17,874 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
..तर कोरोनाची तिसरी लाट दूर, दुसरी लाटच उलटेल-उद्धव ठाकरे
आज राज्यात 6,727 नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 60,43,548 झाली आहे.आज नोंद झालेल्या एकूण 101 मृत्यूंपैकी 86 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 15 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या 186 ने वाढली आहे. हे 186 मृत्यू, ठाणे-66, पुणे-35, पालघर-30, नाशिक-16, परभणी-8, रायगड-8, उस्मानाबाद-6, रत्नागिरी-3, अकोला-2, धुळे-2, लातूर-2, सातारा-2, औरंगाबाद-1, बुलढाणा-1, जळगाव-1, नांदेड-1, सांगली-1 आणि वाशिम-1 असे आहेत.
Covid लसींचे मिक्सिंग? डॉ. राहुल पंडित यांनी काय दिला सल्ला?
10 हजारांपेक्षा जास्त सक्रिय रूग्ण असलेले जिल्हे
मुंबई- 12 हजार 446
ठाणे – 16 हजार 141
पुणे- 17 हजार 42
कोल्हापूर- 10 हजार 875
मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि ठाणे या चार जिल्ह्यांमध्ये 10 हजारांपेक्षा जास्त रूग्ण सक्रिय आहेत असं आहेत असंही या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात सध्या डेल्टा प्लस व्हायरसने टेन्शन वाढवलं आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा सगळ्या जिल्ह्यांमध्ये लेव्हल थ्रीचे नियम लागू करण्यात आले आहेत. तसंच सगळ्यांना काळजी घेण्याचंही आवाहन करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT