महाराष्ट्रात दिवसभरात 35 हजारांपेक्षा Corona रूग्णांना डिस्चार्ज, रिकव्हरी रेट 94 टक्के

मुंबई तक

• 04:30 PM • 01 Jun 2021

महाराष्ट्रात दिवसभरात 35 हजार 949 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत राज्यात 54 लाख 31 हजार 319 कोरोना रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 94.28 टक्के झाले आहे. आज दिवसभरात 14 हजार 123 रूग्णांना कोरोनाची बाधा झाली. दिवसभरात राज्यात 477 कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात दिवसभरात 35 हजार 949 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत राज्यात 54 लाख 31 हजार 319 कोरोना रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 94.28 टक्के झाले आहे. आज दिवसभरात 14 हजार 123 रूग्णांना कोरोनाची बाधा झाली. दिवसभरात राज्यात 477 कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

हे वाचलं का?

Mann Ki Baat: कोरोना काळात ऑक्सिजन कुठून आणि कसं आणलं, स्वत: पंतप्रधान मोदींनी सांगितलं!

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 52 लाख 77 हजार 653 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 57 लाख 61 हजार 15 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 17 लाख 68 हजार 119 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 9315 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्य आज घडीला 2 लाख 30 हजार 681 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 14 हजार 123 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रूग्णांची एकूण संख्या 57 लाख 61 हजार 15 इतकी झाली आहे.

कोरोनाची तिसरी लाट…लहान मुलांना कोरोना आणि केंद्राचा मोठा खुलासा

आज नोंद झालेल्या एकूण 477 मृत्यूंपैकी 340 मृत्यू मागील 48 तासातील तर 137 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूंमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या 377 ने वाढली आहे.

हे 377 मृत्यू, नागपूर- 43, पुणे- 38, रायगड- 37, औरंगाबाद- 35, अहमदनगर- 29, नाशिक- 28, लातूर- 23, नांदेड- 18, पालघर- 15, सातारा- 15, गडचिरोली- 13, उस्मानाबाद- 10, रत्नागिरी- 9, भंडारा- 8, ठाणे- 7, बीड- 6, हिंगोली- 6, कोल्हापूर-5, अकोला- 4, धुळे-4, जळगाव-4, सोलापूर-4, गोंदिया- 3, जालना- 3, नंदूरबार- 3, परभणी- 2, वर्धा-2, बुलढाणा-1, चंद्रपूर-1 आणि सांगली- 1 असे आहेत.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड 19 बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो असंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.

    follow whatsapp