महाराष्ट्रात दिवसभरात 54 हजार 535 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 46 लाख 54 हजार 731 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.34 टक्के इतकं झालं आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 42 हजार 582 नवीन रूग्णांचं निदान झालं आहे. तर राज्यात 850 कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर हा 1.5 टक्के इतका झालेला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 3 लाख 51 हजार 356 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 52 लाख 69 हजार 292 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
ADVERTISEMENT
गेल्या दीड वर्षापासून एकही कोरोना रुग्ण न सापडलेलं महाराष्ट्रातील गाव!
सध्या राज्यात 35 लाख 2 हजार 630 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 28 हजार 847 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 5 लाख 33 हजार 294 अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. राज्यात 42 हजार 582 नवीन रूग्णांची नोंद झली आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 52 लाख 69 हजार 292 झाली आहे.
पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, तरी का बोलवावी लागली ऑक्सिजन एक्सप्रेस?
आज नोंद झालेल्या 850 मृत्यूंपैकी 409 मृत्यू हे मागील 48 तासांमधले आहेत. तर 160 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 281 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधीपूर्वीचे आहेत. हे मृत्यू ठाणे 56, पुणे 40, नागपूर 29, बीड 20, गडचिरोली 19, रत्नागिरी 16, नंदुरबार 15, सोलापूर 15, जळगाव 14, बुलढाणा 11, नाशिक 8, औरंगाबाद 5, चंद्रपूर 4, जालना 4, रायगड 4, सातारा 4, सांगली 3, भंडारा 3, लातूर 2, नांदेड 2, उस्मानाबाद 2, धुळे 1, परभणी 1 आणि सिंधुदुर्ग 1 असे आहेत.
Corona Vaccination : मुंबई महापालिकेनं काढलं लसीचं ग्लोबल टेंडर…पण फायदा होणार?
महाराष्ट्रातले प्रमुख जिल्हे आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या
मुंबई-36 हजार 338
ठाणे-30 हजार 922
पालघर-14 हजार 754
रत्नागिरी-10 हजार 619
पुणे-1 लाख 1 हजार 181
सातारा-23 हजार 647
सांगली-19 हजार 192
सोलापूर-21 हजार 233
नाशिक- 16 हजार 617
अहमदनगर-28 हजार 862
जळगाव-10 हजार 911
बीड-18 हजार 499
अमरावती-10 हजार 937
नागपूर-45 हजार 996
चंद्रपूर- 16 हजार 367
ADVERTISEMENT