महाराष्ट्रात दिवसभरात 5 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज, 154 मृत्यूंची नोंद

मुंबई तक

• 03:35 PM • 19 Aug 2021

महाराष्ट्रात दिवसभरात 5 हजार 557 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत राज्यात एकूण 62 लाख 14 हजार 921 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.93 टक्के इतकं दाखवतं आहे. दिवसभरात राज्यात 5 हजार 225 नवे रूग्ण आढळले आहेत. तर राज्यात दिवसभरात 154 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात दिवसभरात 5 हजार 557 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत राज्यात एकूण 62 लाख 14 हजार 921 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.93 टक्के इतकं दाखवतं आहे. दिवसभरात राज्यात 5 हजार 225 नवे रूग्ण आढळले आहेत. तर राज्यात दिवसभरात 154 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर हा 2.11 टक्के इतका झाला आहे.

हे वाचलं का?

आजवर तपासण्यात आलेल्या 5 कोटी 17 लाख 14 हजार 950 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64 लाख 11 हजार 570 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज घडीला राज्यात 3 लाख 29 हजार 47 रूग्ण होम क्वारंटाईन आहेत तर 2 हजार 614 रूग्ण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आज घडीला महाराष्ट्रात 57 हजार 579 सक्रिय रूग्ण आहेत.

मुंबईत 283 नवे रूग्ण

मुंबईत 283 नवे रूग्ण दिवसभरात आढळले आहेत. तर 203 रूग्णांना दिवसभरात डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आत्तापर्यंत 7 लाख 19 हजार 158 रूग्ण बरे झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका झाला आहे. तर मुंबईत आज घडीला 2760 सक्रिय रूग्ण आहेत.

पुण्यात दिवसभरात 254 नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 119 डिस्चार्ज मिळाले. तर पुण्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यात 2186 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुख्यमंत्र्यांनी काय आवाहन केलं आहे?

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपले डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स यांचं यश आहे. तसंच आपण नागरिक म्हणून घेतलेली काळजी देखील महत्त्वाची आहे. यापुढे आपल्याला प्रत्येक पाऊल सावधपणे टाकणं आवश्यक आहे. आपल्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. फक्त अर्थचक्र सुरळीत रहावे म्हणून काही प्रमाणात निर्बंध शिथील केले आहेत हे विसरता कामा नये असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केली आहे.

नियमांचा भंग करून राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि इतर कार्यक्रम आयोजित करून सर्वसामान्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल अशी काही जणांची वागणूक पाहता चिंता वाटते. आगामी सण आणि उत्सव पाहता आरोग्याच्या नियमांचं उल्लंघन होणार नाही आणि कोव्हिड योद्धा होता नाही आलं तरी निदान कोव्हिडदूत बनून तिसऱ्या लाटेला निमंत्रण देणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घेणं आवश्यक आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp