शिरुर : भरधाव ट्रकची मोटारसायकलला धडक, माय-लेकींचा मृत्यू

पुणे जिल्ह्यात शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी येथे झालेल्या रस्ते अपघाता माय-लेकींचा मृत्यू झाला आहे. टाकळी हाजी ते फाकटे रोडवर झालेल्या या अपघातात जिजाबाई पळसकर (वय ५२) आणि ताराबाई साबळे (वय ७३) यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या अपघातात विलास साबळे हा व्यक्ती गंभीर जखमी झाल्याचं कळतंय. मिळालेल्या माहितीनुसार, टाकळी हाजी येथील विलास महादू साबळे […]

Mumbai Tak

मुंबई तक

15 May 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:08 AM)

follow google news

पुणे जिल्ह्यात शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी येथे झालेल्या रस्ते अपघाता माय-लेकींचा मृत्यू झाला आहे. टाकळी हाजी ते फाकटे रोडवर झालेल्या या अपघातात जिजाबाई पळसकर (वय ५२) आणि ताराबाई साबळे (वय ७३) यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या अपघातात विलास साबळे हा व्यक्ती गंभीर जखमी झाल्याचं कळतंय.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, टाकळी हाजी येथील विलास महादू साबळे व त्यांची आई ताराबाई महादू साबळे हे टाकळी हाजी येथून मोटर सायकलवर साबळेवाडी कडे जात होते. यावेळी फाकटे रोडवर विलास यांची बहीण जिजाबाई पळसकर रस्त्याने पायी जात असताना त्यांना दिसली. बहिणीला पाहिल्यानंतर विलास यांनी रस्त्याच्या कडेला गाडी थांबविली. विलास यांची आई ताराबाई व बहीण जिजाबाई या रस्त्याच्या कडेला बोलत असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने या दोघींना व विलास ज्या मोटारसायकल व बसले होते त्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली.

या अपघातात जिजाबाई यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर ताराबाई या गंभीर जखमी झाल्या होत्या. या अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला. स्थानिकांनी ताराबाई व विलास यांना तातडीची मदत करत दवाखान्यात हलविले. ताराबाई यांना शिरूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्यांचाही तेथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांनी अपघाती ट्रक ताब्यात घेतला असून पोलीस ट्रकचालकाचा शोध घेत आहेत.

    follow whatsapp