दारूच्या व्यसनामुळे पैशांची मागणी करत मुलाकडून आई वडिलांना नेहमी मारहाण करण्यात येत होती. त्यामुळे कंटाळलेल्या आईने दोघांना सुपारी देऊन मुलाचा काटा काढण्यास सांगितलं. ही घटना नांदेडमधल्या बारड शिवारात घडली होती. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा उलगडा केला. या प्रकरणी पोलिसांनी सुपारी देणाऱ्या आईसह दोघांना अटक केली आहे.
ADVERTISEMENT
नेमकी काय घडली बारडमध्ये घटना?
१५ ऑगस्ट रोजी बारड शिवारात कॅनॉलच्या शेजारी सुशील त्र्यंबकराव श्रीमंगले याचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणात पंचनामा केल्यानंतर मयत सुशील याच्या गळ्यावर व्रण आढळून आले. तसेच डोक्यावर मारहाण करण्यात आल्याच्या खुणाही होत्या. या प्रकरणात बारड पोलिसांनी गुन्हा नोंद केला. मयत सुशील श्रीमंगले हा मजूर असून तो नांदेडच्या गीतानगर येथील रहिवासी होता.
या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने आपल्याकडे घेतला. पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. पांडुरंग माने यांनी श्रीमंगले याचे घर गाठून चौकशीला सुरुवात केली. त्यानंतर दोन्ही भाडेकरूंची चौकशी करण्यात आली. त्यामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला.
संपूर्ण कुटुंबाची हत्या, नंतर सामूहिक बलात्कार पण आता नराधमांची सुटका, काय आहे बिल्किस बानो प्रकरण?
मयत सुशील श्रीमंगलेला दारूचं व्यसन होते. त्यातून तो आई शोभा श्रीमंगले आणि वडिलांना नेहमी मारहाण करत होता. अनेकवेळा समजूत घातल्यानंतरही तो दारूच्या पैशांसाठी त्रास देत होता. तसेच घर विकून पैशांची मागणी करीत होता. नेहमी होत असलेल्या या त्रासाला कंटाळून शोभाबाई यांनी मुलगा सुशीलचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.
सख्खा भाऊ बनला पक्का वैरी, अंगणात थुंकल्याने केला मोठ्या भावाचा खून
सुशील श्रीमंगले आई आणि वडिलांना नेहमी करत होता मारहाण
शोभाबाई यांच्या घरी भाडे तत्त्वावर राहत असलेल्या राजेश गौतम पाटील आणि विशाल देवराव भगत या दोघांना त्यासाठी शोभाबाई यांनी सुपारी दिली. त्यानंतर या दोघांनीही सुशीलला बारड परिसरात नेले. या ठिकाणी गळा आवळून त्याचा खून करण्यात आला. पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून बारड पोलिसांच्या ताब्यात दिलं. बारड़ पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
ADVERTISEMENT