टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भालाफेकीत सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या नीरज चोप्रावर सध्या सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. देशात स्वातंत्र्य दिनचा उत्साह असताना मुंबईतल्या तरुणाने एका विशेष कालकृतीतून निरज चोप्राला शुभेच्छा दिल्या आहेत.
ADVERTISEMENT
नीरज चोप्रावर सध्या देशभरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. मुंबईतला मोझ्यक आर्टीस्ट चेतन राऊतने २१ हजार पुश पिन्सच्या माध्यमातून ४ फुट लांब आणि ४ फुट रुंदीचे नीरज चोप्राचे मोझ्येक पोर्ट्रेट तयार केलं आहे.
चेतन राऊत हा कलाकारा गेली अनेक वर्ष मोझ्यक आर्टच्या माध्यमातून अनेक नामवंत लोकांची पोर्ट्रेट तयार करतो. नीरज चोप्राचं पोर्ट्रेट तयार करण्यासाठी चेतनला १२ तासांचा अवधी लागला. २१ हजार पुश पिन्सच्या सहाय्याने आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत चेतन राऊतने नीरज चोप्राची ही सुंदर कलाकृती साकारली आहे.
नीरज चोप्रा मुळचा हरियाणातल्या पानीपत गावचा. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नीरज चोप्राला सहा कोटींचं बक्षीस, सरकारी नोकरी आणि ट्रेनिंगसाठी सवलतीच्या दरात जागा देण्याचं आश्वासन दिलं आहे. याव्यतिरीक्त इतर राज्यांची सरकार आणि क्रीडा संघटनांनीही नीरजवर बक्षीसांचा वर्षाव केला आहे. जाणून घ्या नीरजला आतापर्यंत जाहीर झालेल्या बक्षीसांची यादी…
Tokyo Olympics : ना सोशल मीडिया, ना फोन हातात घेतला…वाचा Neeraj ने कसं केलं स्वतःला तयार?
१) हरियाणा सरकार – ६ कोटी
२) पंजाब सरकार – २ कोटी
३) केंद्र सरकार – ७५ लाख
४) मणीपूर सरकार – १ कोटी
५) बीसीसीआय – १ कोटी
६) चेन्नई सुपरकिंग्ज – १ कोटी
ADVERTISEMENT