“सावधान! काही लोक तुमच्या मागावर आहेत” अपक्ष खासदार नवनीत राणा यांना मिळाली निनावी चिठ्ठी

मुंबई तक

• 10:00 AM • 29 Jul 2022

सावधान काही लोक तुमच्या मागावर काही लोक आहेत असा मजकूर असलेली एक निनावी चिठ्ठी अपक्ष खासदार नवनीत राणा यांना मिळाली आहे. चिठ्ठी कुणी लिहिली आहे ते समोर आलेलं नाही कारण या चिठ्ठीवर कुणाचंही नाव नाही. अमरावतीत उमेश कोल्हे यांची हत्या झाली. त्या प्रकरणी आवाज उठवल्यानंतर आता नवनीत राणा यांना धमक्या देण्यात येत आहेत. आता त्यांना […]

Mumbaitak
follow google news

सावधान काही लोक तुमच्या मागावर काही लोक आहेत असा मजकूर असलेली एक निनावी चिठ्ठी अपक्ष खासदार नवनीत राणा यांना मिळाली आहे. चिठ्ठी कुणी लिहिली आहे ते समोर आलेलं नाही कारण या चिठ्ठीवर कुणाचंही नाव नाही. अमरावतीत उमेश कोल्हे यांची हत्या झाली. त्या प्रकरणी आवाज उठवल्यानंतर आता नवनीत राणा यांना धमक्या देण्यात येत आहेत. आता त्यांना ही निनावी चिठ्ठी मिळाली आहे.

हे वाचलं का?

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना मिळाली निनावी चिठ्ठी

अमरावतीच्या अपक्ष खासदार या हनुमान चालीसा मुळे चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. आता उमेश कोल्हे हत्या प्रकरणात आवाज उठवत आहेत. उमेश कोल्हे हत्या प्रकरण चर्चेत होतं. आता त्यावर आवाज उठवल्या प्रकरणी नवनीत राणा यांना एक चिठ्ठी मिळाली आहे. त्यात तुमच्या मागावर काही लोक असल्याचा उल्लेख आहे. तुम्ही सावध व्हा, तुमची काळजी घ्या असंही या चिठ्ठीत नमूद करण्यात आलं आहे.

काय म्हटलं आहे नवनीत राणा यांना पत्रात?

मॅडम मी तुम्हाला माझं नाव सांगू इच्छित नाही. मी तुमच्या अमरावती शहरात राहणारा एक सामान्य नागरिक आहे. मात्र मी तुम्हाला सावध करू इच्छितो की तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. कारण काही लोक तुमच्या मागावर आहेत, तुमचा पाठलाग करत आहेत. मी एक सरकारी कर्मचारी आहे, तुम्ही माझी बरीच मदत केली आहे. त्यामुळेच मी तुम्हाला हे पत्र लिहून सावध करतो आहे. असं या पत्रात म्हटलं आहे.

या चिठ्ठीत हे देखील नमूद करण्यात आलं आहे की नवनीत राणा यांचा पाठलाग करणारे लोक हे राजस्थान बॉर्डरवरून आले आहेत. ही माहिती आपल्याला मिळाली आहे असं या चिठ्ठी पाठवणाऱ्याने म्हटलं आहे. एवढंच नाही तर हे लोक तुमच्या घरी येऊन गेले आहेत असंही चिठ्ठीत म्हटलं आहे. गेल्या महिन्यात अमरावतीत मेडिकल चालवणारे उमेश कोल्हे यांची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. त्याबाबत नवनीत राणा यांनी प्रश्न विचारले होते. त्यानंतर त्यांना धमक्या मिळत आहेत.

उमेश कोल्हे यांच्या हत्येचं प्रकरण काय आहे?

राजस्थानच्या उदयपूरमध्ये जी कन्हैय्या शर्माच्या हत्येची घटना समोर आली तशीच घटना महाराष्ट्रातल्या अमरावतीत झाली आहे. मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या एका विशिष्ट समाजाच्या लोकांनी चायनीज सुरा मारून केली. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

उमेश कोल्हे यांचा मुलगा आणि सुनेच्या समोरच ही घटना घडली. उमेश कोल्हे यांना तातडीने रूग्णालयात नेण्यात आलं. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. यानंतर आता उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांचं समर्थन केलं होतं म्हणून त्यांची हत्या करण्यात आली असा आरोप होऊ लागला आहे. नुपूर शर्माला समर्थन देणारी पोस्ट उमेश कोल्हे यांनी त्यांच्या स्टेटसवर ठेवली होती असंही समोर येतं आहे.

    follow whatsapp