ऑल इंडिया फुलबॉल फेडरेशनचे अध्यक्ष आणि खासदार प्रफुल पटेल यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. प्रफुल्ल पटेल यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली आहे. जवळपास एक तास राज्यपाल आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरु होती.
ADVERTISEMENT
दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. पण त्यांच्या याच सदिच्छा भेटीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती बघता अशा स्वरुपाच्या राजकीय भेटीगाठी या सुरु असतात. पण सुप्रिया सुळे यांनी राज्यपालांची पंढरपूर आणि पाच राज्यातील निकालांच्या दिवशी भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं होतं.
तर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांनीही राज्यपालांची भेट घेतल्याने भेटीचे राजकीय अर्थ देखील काढले जात आहेत.
ADVERTISEMENT