Ladki Bahin Yojana Diwali Bonus Update: राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. सरकारने महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करण्याची तरतूद केली आहे. तसच महिलांना सरकारकडून दिवाळी बोनसचे 5500 रुपये मिळणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. दिवाळी बोनसची रक्कम थेट पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल, असं सांगितलं जात होतं.परंतु, राज्य सरकारने या योजनेबाबत नुकतीच महत्त्वाची घोषणा केलीय.
ADVERTISEMENT
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना दिवाळीचं छोटसं गिफ्ट देण्याच निर्णय घेतल्याचं समजते. ऑक्टोबर महिन्यात सर्व पात्र महिलांना अतिरिक्त 1500 रुपये मिळणार आहेत. महिलांना दिवाळी उत्सव दणक्यात साजरा करता यावा, यासाठी सरकारने अशाप्रकारे दिवळीचं गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा >> Gold Price Today in Choti Diwali : सोन्याने नादच केलाय थेट! दिवाळीत रेकॉर्ड ब्रेक भाव, 1 तोळ्याचा दर किती?
माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत राज्य सरकारकडून दिवाळीच्या मुहूर्तावर प्रत्येक पात्र महिलेला एकूण 5500 रुपयांचं आर्थिक सहाय्य मिळणार आहे. यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे मिळून 3000 आणि अतिरिक्त 2500 रुपयांचा दिवाळी बोनस मिळेल, अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर महिलांना ऑक्टोबर महिन्याच्या रक्कमेसह दिवाळी बोनस मिळण्याची प्रतिक्षा लागली होती.
दिवाळी बोनसह लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याच्या एकत्रित रक्कम खात्यात जमा होईल, असं महिलांना वाटत होतं. परंतु, महिला व बालविकास खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांना दिवाळी बोनस मिळणार नाही, हे स्पष्ट केलं. दिवाळी बोनसबाबत व्हायरल झालेले मेसेज खोटे आहेत, असं त्या म्हणाल्या.
हे ही वाचा >> Maharashtra Weather: विजांचा कडकडाट, वादळी वारा! ऐन दिवाळीत पावसाचा धुमधडाका?
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गरजू महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत. यासाठी राज्य सरकारने आर्थिक संकल्पात जवळपास 46 हजार कोटी रुपयांची तरतूद केलीय. या योजनेच्या माध्यमातून अडीच कोटींहून अधिक महिलांना आर्थिक लाभ मिळाल्याचं सरकारकडून सांगण्यात येतंय.
ADVERTISEMENT