मुलायम सिंह यांचं निधन, मागे किती संपत्ती सोडून गेले ठाऊक आहे?

मुंबई तक

• 12:18 PM • 10 Oct 2022

समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले मुलायम सिंह यादव यांनी आज जगाचा निरोप घेतला. तरुणपणी कुस्तीचे शौकीन असलेले मुलायमसिंह यादव आधी शिक्षक झाले आणि नंतर आखाड्याची माती गुंडाळून राजकीय आखाड्यात उडी घेतली, आणि सत्तेच्या शिखरावर पोहोचले. मुलायम सिंह यांनी त्यांच्या कुटुंबासाठी मोठा राजकीय वारसा आणि त्यांच्या दोन मुलांसाठी, अखिलेश यादव आणि […]

Mumbaitak
follow google news

समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले मुलायम सिंह यादव यांनी आज जगाचा निरोप घेतला. तरुणपणी कुस्तीचे शौकीन असलेले मुलायमसिंह यादव आधी शिक्षक झाले आणि नंतर आखाड्याची माती गुंडाळून राजकीय आखाड्यात उडी घेतली, आणि सत्तेच्या शिखरावर पोहोचले. मुलायम सिंह यांनी त्यांच्या कुटुंबासाठी मोठा राजकीय वारसा आणि त्यांच्या दोन मुलांसाठी, अखिलेश यादव आणि प्रतीक यादव यांच्यासाठी कोट्यवधींची संपत्ती सोडली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मैनपुरी मतदारसंघातून निवडणूक फॉर्म भरताना त्यांनी प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीची माहिती दिली होती.

हे वाचलं का?

संपत्ती किती आहे?

मुलायम सिंह यादव यांच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची एकूण संपत्ती १६.५२ कोटी रुपये होती. या स्थावर मालमत्तेचा खुलासा करताना त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुलायम सिंह आणि त्यांची पत्नी साधना यादव यांचे वार्षिक उत्पन्न ३२.०२ लाख रुपये होते.

मुलाकडून 2 कोटींहून अधिक कर्ज घेतले

कोटय़वधींची संपत्ती असूनही त्यांच्यावर २,१३,८०,००० रुपयांचे कर्ज होते. विशेष म्हणजे हे कर्ज त्यांनी स्वतः त्यांचा मुलगा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडून घेतले होते. मात्र, त्यांनी हे कर्ज का घेतले याचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात नाही. रिपोर्टनुसार, मुलायम सिंह यांच्याकडे कॅमरी टोयोटा कार रेग कार होती.

राजकीय वारसा अखिलेश यांच्याकडे सोपवला

मुलायम सिंह यांनी त्यांचा संपूर्ण राजकीय वारसा त्यांचे ज्येष्ठ पुत्र अखिलेश यादव यांच्याकडे सोपवला. 2012 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष विजयी झाला तेव्हा मुलायम सिंह यांनी अखिलेश यादव यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपवले. आपल्या राजकारणात अखिलेशचा रुबाब वाढला आणि मुलायम सिंह यांची तब्येत बिघडू लागली तेव्हा अखिलेश यांनी पक्षाची जबाबदारीही घेतली.

संपत्ती 3 कोटींनी कमी झाली

पीटीआयच्या वृत्तानुसार, समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांच्या संपत्तीत पाच वर्षांत सुमारे 3 कोटी रुपयांची घट झाली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मुलायम सिंह यादव यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांची एकूण संपत्ती 19.72 रुपये होती. जे पाच वर्षांनंतर म्हणजेच 2019 मध्ये 16.52 कोटी रुपये झाली.

    follow whatsapp