Mumbai Covid Update : मुंबईत २४ तासांत आढळले १८०० पेक्षा अधिक रुग्ण, १३ रुग्णांचा मृत्यू

मुंबई तक

• 03:38 PM • 26 Jan 2022

मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला ओहोटी लागल्याची दिलासादायक स्थिती दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत दररोज रुग्णसंख्या कमी होत असून, आता दैनंदिन रुग्णवाढ २ हजारांच्या आत स्थिरावली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत १,८५८ रुग्ण आढळून आले असून, १३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे गेल्या २४ तासांत मुंबईत १,८५८ नवीन कोरोना […]

Mumbaitak
follow google news

मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला ओहोटी लागल्याची दिलासादायक स्थिती दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत दररोज रुग्णसंख्या कमी होत असून, आता दैनंदिन रुग्णवाढ २ हजारांच्या आत स्थिरावली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत १,८५८ रुग्ण आढळून आले असून, १३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हे वाचलं का?

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे गेल्या २४ तासांत मुंबईत १,८५८ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. यात २३३ रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यात आलं असून, यामध्ये ४८ रुग्णांना ऑक्सिजन बेडवर भरती करण्यात आलं आहे. २४ तासांत १,६५६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

ओमिक्रॉन पोहोचला मुंबईच्या गल्लीबोळात! ८९ टक्के कोरोनाबधित मुंबईकरांना संसर्ग झाल्याचं समोर

मुंबईत आतापर्यंत ९,९६,६५६ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट ९६ टक्के इतका असून, मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या २२,३६४ इतकी आहे. रुग्ण दुप्पटीचा कालावधी १८५ दिवसांवर पोहोचला आहे.

मागील २४ तासांत मुंबईत १३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आतारपर्यंत कोरोनामुळे १६,५६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत दिवसभरात ४२,३१५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

लहान मुलांसाठी डेल्टापेक्षा जास्त घातक ठरू शकतो ओमिक्रॉन, काय म्हणत आहेत तज्ज्ञ?

मागील तीन दिवसांपासून मोठी घट

मुंबईत दररोज आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येत मागील तीन दिवसांपासून मोठी घट झाल्याचं दिसत आहे. हळूहळू खाली आलेला रुग्णवाढीचा आलेख १८०० ते १९०० च्या दरम्यान स्थिरावला आहे. मागील तीन दिवसांपासून मुंबईत दररोज १८०० च्या आसपास रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे परिस्थिती सुधारण्याची आशा वाढली आहे.

१० दहा दिवसांत आढळून आलेले रुग्ण (कंसात चाचण्या)

१७ जानेवारी – ५,९५६ (४७,५७४)

१८ जानेवारी – ६,१४९ (४७,७००)

१९ जानेवारी – ६,०३२ (६०,२९१)

२० जानेवारी – ५,७०८ (५३,२०३)

२१ जानेवारी – ५,००८ (५०,०३२)

२२ जानेवारी – ३,५६८ (४९,८९५)

२३ जानेवारी – २,५५० (४५,९९३)

२४ जानेवारी – १,८५७ (३४,३०१)

२५ जानेवारी – १,८१५ (३४,४२७)

२६ जानेवारी – १,८५८ (४२,३१५)

    follow whatsapp