मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षिण मुंबईतील गिरगावमध्ये एका दुकानातून तब्बल 2.4 कोटी रुपयांची सोन्याच्या विटा लांबवल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आता एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली. चंद्रभान पटेल (36) असं आरोपीचं नाव असून तो उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Allu Arjun : अल्लू अर्जून पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये, आज चौकशी होणार? हैदराबादमध्ये नेमकं काय घडतंय?
गेल्या 18 डिसेंबर रोजी ही घटना उघडकीस आली होती. एका 65 वर्षीय व्यावसायिकाने व्हीपी रोड पोलिस स्टेशनमध्ये त्यांचं दुकान फोडल्याबद्दल तक्रार दाखल केली होती. मुख्य दरवाजा तोडून आरोपींनी ऑफिसमध्ये जात एक किलो वजनाच्या तीन सोन्याच्या विटा आणि काही रोख रक्कम चोरून नेल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. पोलिसांनी ही माहिती दिली आहे.
पोलिसांनी सांगितलं की, या प्रकरणाचा तपास केला असता आरोपीची ओळख समोर आली. चौकशीत आरोपी हे सीपी टँक परिसरात कपडे विकायचे, अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे चोरीला गेलेला माल जप्त करण्यात आला आहे.
हे ही वाचा >> Suresh Dhas : "मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी कुणीही बीडचं पालकमंत्रिपद...."; सुरेश धस यांचा मुंडेंना थेट विरोध?
यापूर्वी, मुंबई पोलिसांनी गेल्या 6 महिन्यांत 127 चोरीचे मोबाईल शोधले होते. देशाच्या विविध भागांतून हे मोबाईल जप्त केल्यानंतर, ते त्यांच्या नोंदणीकृत मालकांना परत करण्यात आले होते. तंत्रज्ञानाच्या मदतीने हे मोबाइल फोन कर्नाटक, आसाम, पश्चिम बंगाल आणि राजस्थानमधून शोधण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
