ADVERTISEMENT
रेल्वेकडून प्रत्येक रविवारी रेल्वे मार्गांच्या कामासाठी मेगाब्लॉक घेतला जातो. आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि पनवेल ते वाशी मार्गावर मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आलेला आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर मात्र दिवसा ब्लॉक असणार नाही. शनिवारी व रविवारी मध्यरात्री ब्लॉक घेतला जाणार असल्यानं हा निर्णय घेण्यात आला.
सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ यावेळेत मेगा ब्लॉक असणार आहे.
या मेगा ब्लॉकच्या काळात सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरून धावणार आहेत.
हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मेगा ब्लॉक असणार आहे. सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ यावेळेत हा मेगा ब्लॉक असणार आहे.
या काळात सीएसएमटी ते वाशी, ठाणे-वाशी, नेरूळ-बेलापूर, नेरूळ आणि खारकोपर या दरम्यान लोकल धावणार आहेत.
सीएसएमटी ते पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक बंद असणार आहे. ठाणे ते पनवेल दरम्यान लोकल फेऱ्या बदं राहतील.
पश्चिम रेल्वे मार्गावर माहीम ते सांताक्रूझ दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रात्री १२.३० ते पहाटे ३.३० या काळात (शनिवार, रविवार) मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे ब्लॉक काळात धीम्या फेऱ्या जलद मार्गावरून धावणार आहेत.
ADVERTISEMENT