फाईव्हस्टार हॉटेलमध्ये लसीकरणाचं पॅकेज, नियमांचं उल्लंघन होत असल्याने महापौरांकडून चौकशीचे आदेश

मुंबई तक

• 11:59 AM • 30 May 2021

मुंबईतील लसीकरण केंद्रांवर एकीकडे लसीचा तुटवडा असताना काही फाईव्हस्टार हॉटेलमध्ये पॅकेजच्या माध्यमातून लस दिली जात आहे. परंतू या हॉटेलमध्ये लस देताना नियमांचं पालन होत नसल्याची माहिती महापालिका प्रशासनाला मिळाली होती. त्यावरुन महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतल्या द ललित हॉटेलला भेट देऊन लसीकरण व्यवस्थेचा आढावा घेतला. या पाहणीत नियमांचं उल्लंघन होत असल्याचं लक्षात येताच किशोरी पेडणेकर […]

Mumbaitak
follow google news

मुंबईतील लसीकरण केंद्रांवर एकीकडे लसीचा तुटवडा असताना काही फाईव्हस्टार हॉटेलमध्ये पॅकेजच्या माध्यमातून लस दिली जात आहे. परंतू या हॉटेलमध्ये लस देताना नियमांचं पालन होत नसल्याची माहिती महापालिका प्रशासनाला मिळाली होती. त्यावरुन महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतल्या द ललित हॉटेलला भेट देऊन लसीकरण व्यवस्थेचा आढावा घेतला. या पाहणीत नियमांचं उल्लंघन होत असल्याचं लक्षात येताच किशोरी पेडणेकर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

हे वाचलं का?

या पाहणीदरम्यान लस ठेवण्यासाठीच्या शीतपेट्यांचं व्यवस्थित परीक्षण होत नसल्याचं महापौरांच्या निदर्शनास आलं. याचसोबत ललित हॉटेलमध्ये कोल्ड चेन मेंटेन केली जात नसून घरगुती वापराच्या फ्रीजमध्ये कोविडच्या लसींचा साठा करण्यात आला होता. आईस बॅग म्हणून पाण्याच्या बाटल्यांचा वापर होत असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांच्या निदर्शनास आलं. या बाबत पेडणेकर यांनी व्यवस्थापनाला जाब विचारला असून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

द ललित हॉटेलमध्ये क्रिटीकेअर रुग्णालयाच्या माध्यमातून लस दिली जात आहे. मात्र या हॉटेलमध्ये लसीच्या साठवणीच्या पद्धतीबद्दल साशंकता आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रकरणाची माहिती मिळताच महापौर किशोरी पेडणेकर यांनी ललित हॉटेलमध्ये लसीकरणाचा आढावा घेतला. हॉटेलकडून होणाऱ्या नियमांच्या उल्लंघनाची चौकशी करण्यात येणार असल्याचंही पेडणेकर यांनी सांगितलं.

    follow whatsapp