मुंबई उप-नगरातल्या दहीसर पश्चिम येथील स्टेट बँकेच्या शाखेवर पडलेल्या दरोड्यातील आरोपींना अवघ्या ८ तासांत जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. बुधवारी संध्याकाळी स्टेट बँकेत साडेतीन वाजल्याच्या दरम्यान दोन आरोपींनी येऊन गोळीबार केला होता, ज्यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यूही झाला. परंतू बँकेतून पळून जाताना आरोपीची एक चप्पल तिकडेच राहिली. याच पुराव्याच्या आधारावर पोलिसांनी श्वान पथक व सीसीटीव्हीच्या सहाय्याने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी दरोडेखोर लुटीच्या उद्देशाने बँकेत शिरले त्यावेळी त्यांनी संदेश गोमरे या कर्मचाऱ्याकडे असलेली पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. संदेशने याला विरोध केल्यानंतर एका आरोपीने त्याला गोळी मारली, ज्यात संदेशचा मृत्यू झाला. यानंतर दरोडेखोरांनी बँकेतून पळ काढला.
मेडिकलची विद्यार्थिनी सदिच्छा साने महिना उलटूनही बेपत्ताच, पोस्ट लिहून हेमांगी कवीनेही व्यक्त केली चिंता
परंतू बँकेतून पळ काढताना एका आरोपीची चप्पल तिकडेच राहिली आणि पोलिसांचं काम सोपं झालं. श्वानपथक आणि सीसीटीव्हीच्याी सहाय्याने पोलिसांनी या प्रकरणातील दोन्ही आरोपी धर्मेंद्र यादव आणि विकास यादव यांना अटक केली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर उभं केलं असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दोघांनीही यु-ट्यूबवर व्हिडीओ पाहून लुटीची योजना बनवली होती. ज्यासाठी लागणारं शस्त्र त्यांनी आपलं उत्तर प्रदेशातील गाव भदोई वरुन मागवलं होतं.
‘अहमदाबाद पोलीस कमिशनर बोल रहा हूँ’…सुताराचा एक फोन आणि कृष्णप्रकाश यांच्या टीमला हजारोंचा गंडा
ADVERTISEMENT