मुंबई पोलिसांच्या Crime Intelligence Unit ने पायधुनी भागातून बनावट नोटा छापणाऱ्या एका ४७ वर्षीय इसमाला अटक केली आहे. शब्बीर हसन कुरेशी असं या आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून २ हजारच्या ५३ बनावट नोटा जप्त केल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुरेशी या नोटा आपल्या घरात बनवत होता. या नोटा बनवण्यासाठी लागणारं साहित्यही पोलिसांनी जप्त केलंय.
ADVERTISEMENT
पोलिसांनी या कारवाईत कम्प्यूटर, प्रिंटर, शाई, पेपर असा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी पायधुनी भागात कुरेशीच्या घरावर छापेमारी केली. यालवेळी चौकशीदरम्यान कुरेशीवर आणखी दोन गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांना लक्षात आलंय. ज्यापैकी राजस्थानमधील अजमेर भागात बनावट नोटा तयार करण्यासंदर्भात तर घाटकोपर भागात ड्रग्ड पेडलिंग केल्यासंदर्भात कुरेशीविरुद्ध गुन्हा नोंद आहे.
प्राथमिक तपासानंतर कुरेशीने बनावट नोटा छापण्याचं काम मुंबईत काही दिवसांपूर्वीच सुरु केल्याचं कळतंय. कुरेशीने या नोटा बाजारात वापरल्या आहेत की नाही याचा पोलीस तपास करत आहेत. इन्स्पेक्टर मिलींद काथे यांच्या पथकाने ही कारवाई केली असून कोर्टाने ३० नोव्हेंबरपर्यंत आरोपीला पोलीस कोठडीत पाठवलं आहे.
Shakti Mill Gangrape : हायकोर्टाकडून तिन्ही आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा
ADVERTISEMENT