मुंबई पोलिसांनी शहरात जमावबंदीचं कलम १४४ लावण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या कार्यालयाने याबाबतचा आदेश काढला आहे. या आदेशानुसार शहरात पाचपेक्षा जास्त लोकांना जमण्यास मनाई घालण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
मुंबई विमानतळावर कोरोना प्रतिबंधाचे नियम न पाळल्यास भरावा लागणार भरमसाठ दंड
काय म्हटलं आहे या आदेशात?
कोरोनाची साथ वाढत चालली आहे. त्यामुळे माणसाला जीवाचा धोका निर्माण झाला आहे. तसंच आरोग्य, सुरक्षा या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. त्या दृष्टीने मुंबईत जमावबंदीचं कलम १४४ लागू करण्यात येतं आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणं म्हणजेच किमान सहा फुटांचे अंतर, चेहऱ्यावर मास्क लावणं आणि कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळणं हे सक्तीचं आहे असंही या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
जुहू बीचवर फिरायला जायचं असेल तर कोव्हिड टेस्ट करावी लागणार
आणखी काय म्हटलं आहे या आदेशात?
कलम १४४ महाराष्ट्रातही लावण्यात येणार आहे
सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत सोमवार ते शुक्रवार या कालावधीत ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मज्जाव
सोमवार ते शुक्रवार या कालावधीत रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत कर्फ्यू असेल. या वेळेत कुणालाही योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही तसं कुणी बाहेर पडलेलं आढळल्यास कारवाई करण्यात येईल.
या आदेशात नमूद करण्यात आलेले नियम हे ४ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत लागू असणार आहेत. तसंच याआधी देण्यात आलेल्या सूचनाही ३० एप्रिलपर्यंत कायम असतील
स्पेशल केसेसमध्ये कुणाला काही संमती द्यायची असेल तर त्याचे अधिकार आहे विभागीय आणि जिल्हा स्तरावर घेण्यात येतील
आज आदेशात देण्यात आलेले नियम हे पाळणं ५ एप्रिलच्या रात्री ८ वाजल्यापासून ३० एप्रिलच्या रात्री ११.५९ मिनिटांपर्यंत असतील. शासन या नियमात बदल करू शकतं.
जे कुणीही हे आदेश पाळणार नाहीत त्यांच्यावर कलम १८८ आणि इंडियन पीनल कोड १८६० अन्वये कारवाई करण्यात येईल.
ADVERTISEMENT