मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या जाहीर भाषणात बोलत असताना मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा काढल्यानंतर राज्यातलं राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलेलं आहे. ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे काढले जावेत असा अल्टिमेटम राज यांनी आपल्या भाषणात दिला होता. यानंतर राज्यात अनेक ठिकाणी अझान विरुद्ध हनुमान चालीसा असा राजकीय वादही रंगलेला पहायला मिळाला.
ADVERTISEMENT
राज ठाकरेंनी दिलेल्या अल्टिमेटकडे पाहता, ३ मे ला शहरात कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट तयारी केल्याचं कळतंय.
रात्री 10 ते सकाळी 6 शहरात भोंग्यांना बंदी ! मुंबई पोलिसांचा महत्वाचा निर्णय
तीन तारखेपर्यंत जर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे मशिदीवरील भोंगे खाली उतरले नाही तर मनसे आपल्या स्टाईलने त्याला उत्तर देईल असा अल्टिमेटम राज यांनी दिला होता. त्यामुळे मुंबई पोलिसांनी ३ तारखेसाठी अशा पद्धतीने तयारी करुन ठेवली आहे की एखाद्या ठिकाणाहून जर तक्रार आली तर ५ मिनीटांत मुंबई पोलीस तिकडे पोहचणार आहेत.
मुंबई पोलिसांनी शहरातील संवेदनशील आणि अतिसंवेदवशील भागांची यादी तयार केली असून त्या भागात पोलीस विशेष गस्त घालणार आहेत. शहरातील ९४ पोलीस ठाण्यांमध्ये १५०४ पॉईंट्स तयार करण्यात आले आहेत. २४ तास पेट्रोलिंगच्या हिशोबाने मुंबई पोलिसांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात ४ बीट चौक्यांमध्ये विशेष पथकं नेमून कोणताही अनुचित प्रसंग घडणार नाही याची काळजी मुंबई पोलीस घेणार आहेत.
Bhonga: चार वर्षांपूर्वी तयार झालेला ‘भोंगा’ सिनेमा मनसे आताच का करतोय प्रदर्शित?
याव्यतिरीक्त मुंबईत SRPF ची ५७ वी तुकडी हाय अलर्टवर ठेवण्यात आली आहे. याव्यतिरीक्त दंगल नियंत्रण पथक, IRCP आणि डेल्टा टीम्स तैनात करण्यात आल्या असून कोणताही अनुचित प्रसंग टाळण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्याचं कळतंय.
ADVERTISEMENT