ADVERTISEMENT
मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर आज भीषण अपघात झाला. ट्रेलरने एकापाठोपाठ चार कारला धडक दिली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्य झाला, तर दोघे जखमी झाले आहेत. जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर शनिवारी दुपारी मुंबईकडे जाणाऱ्या एका भरधाव ट्रेलरने तब्बल ४ गाड्यांना धडक दिल्यानं भीषण अपघाताची घटना घडली. चालकाचं ट्रेलरवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईकडे निघालेल्या ट्रेलर बोरघाटातून जात असताना अचानक चालकाचं ट्रेलवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर ट्रेलरने पहिली धडक एका हुयुंदाई कारला दिली. ट्रेलरचा वेग जास्त असल्यानं नंतर काही अंतरावर असलेल्या क्रेटा कारवर जाऊन धडकला. त्यामुळे क्रेटा कार मीडिल गार्डन मध्ये घुसली.
नियंत्रण सुटलेल्या ट्रेलरने नंतर पुढे जाऊन काही किलोमीटर अतंरावर असलेल्या ईरटिगा गाडीला उडवलं.
त्यानंतर सुसाट निघालेला ट्रेलर बोलेनो कारला जाऊन धडकला. अचानक धडक बसल्याने कार उलटली.
लागोपाठ चार गाड्यांना धडक दिल्यानंतर 100 अंतर पुढे जाऊन ट्रेलर महामार्गाच्या डाव्या बाजूस उलटला.
ट्रेलरने एकूण चार वाहनानांना धडक दिली. सुदैवाने त्या चारी गाड्यांतील प्रवाशी थोडक्यात बचावले. मात्र त्यांना किरकोळ मार लागला आहे.
जखमींपैकी दोघांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, ट्रेलरमधील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही म्रुतांची नावं समजु शकली नाहीत.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महामार्ग वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस स्टेशनची यंत्रणा, डेल्टा फोर्स, लोकमान्य आरोग्य सेवा यांनी धाव घेत मदत कार्य हाती घेतलं.
या अपघातात अनिता सिंग (वय ५४, गंभीर) अखिलेश सिंग (वय ५५ किरकोळ जखमी) रा. रोसे-पारडे, पुणे हे दोघे जखमी झाले. दोघांनाही तातडीने कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आलं.
ADVERTISEMENT