अमरावतीच्या उमेश कोल्हेंची हत्या नुपूर शर्मा यांच्याविषयीच्या पोस्टमुळेच,पोलिसांची माहिती

मुंबई तक

02 Jul 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:11 AM)

अमरावतीचे व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मांविषय़ी समर्थन करणारी पोस्ट केल्यानेच झाली. ही माहिती पोलीस उपायुक्त विक्रम साली यांनी दिली आहे. यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने अमरावतीतल्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला आहे. पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश कोल्हे हत्या प्रकरणात सहा आरोपींना अटक […]

Mumbaitak
follow google news

अमरावतीचे व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मांविषय़ी समर्थन करणारी पोस्ट केल्यानेच झाली. ही माहिती पोलीस उपायुक्त विक्रम साली यांनी दिली आहे. यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने अमरावतीतल्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला आहे.

हे वाचलं का?

पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश कोल्हे हत्या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला. त्यात प्रथमदर्शनी उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांना पाठिंबा देत जी पोस्ट केली होती त्यातूनच त्यांची हत्या झाल्याचं निष्पन्न झालं आहे. आत्तापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे असंही त्यांनी सांगितलं.

काय आहे प्रकरण?

राजस्थानच्या उदयपूरमध्ये जी कन्हैय्या शर्माच्या हत्येची घटना समोर आली तशीच घटना महाराष्ट्रातल्या अमरावतीत झाली आहे. मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या एका विशिष्ट समाजाच्या लोकांनी चायनीज सुरा मारून केली. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

उमेश कोल्हे यांचा मुलगा आणि सुनेच्या समोरच ही घटना घडली. उमेश कोल्हे यांना तातडीने रूग्णालयात नेण्यात आलं. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. यानंतर आता उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांचं समर्थन केलं होतं म्हणून त्यांची हत्या करण्यात आली असा आरोप होऊ लागला आहे. नुपूर शर्माला समर्थन देणारी पोस्ट उमेश कोल्हे यांनी त्यांच्या स्टेटसवर ठेवली होती असंही समोर येतं आहे.

भाजपनेही या प्रकरणी एनआयने लक्ष घालावं अशी मागणी केली. भाजपचे स्थानिक नेते त्याचप्रमाणे नितेश राणे यांनीही ट्विट करत महाराष्ट्रातही उदयपूरसारखी एका मेडिकल व्यावसायिकाची हत्या घडवून आणली गेली असं ट्विट केलं आहे. उमेश कोल्हे यांच्या गळ्यावर वार करून त्यांची २१ जूनला हत्या करण्यात आली होती. ही हत्या नुपूर शर्मा प्रकरणाशी संबंधित आहे का? याचा काटेकोर तपास करावा अशी मागणी भाजपच्या शिवराय कुलकर्णी यांनी केली आहे. त्याच अनुषंगाने पोलिसांनी तपासही सुरू केला. मात्र तसा काही अँगल समोर आला नाही असं म्हटलं होतंय तर दुसरीकडे या प्रकरणी एनआयचे अधिकारी अमरावतीत दाखल झाले आहेत. या प्रकरणी आता पोलिसांनी नुपूर शर्मा प्रकरणामुळेच ही हत्या झाल्याचं म्हटलं आहे.

    follow whatsapp