नागपुरात एक धक्कादायक घटना घडली असून, इंजिनीअरिंगच्या एका विद्यार्थ्यानं आपल्याच आई-वडिलांची निघृण हत्या केली आहे .परीक्षेत वारंवार नापास झाल्यानंतर दुसऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालक दबाव आणत होते, यामुळेच हा निर्णय या तरूणानं घेतल्याचं समजतंय.
ADVERTISEMENT
आरोपी तरूण इंजिनीअरिंगचं शिक्षण घेत असून, वारंवार नापास होत असल्यानं त्याचे पालक दुसऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकत होते अशी माहिती समोर आली आहे. या घटनेत लीलाधर डाखोळे आणि त्यांची पत्नी अरुणा डाखोळे यांना त्यांच्याच मुलाने संपवलं आहे.
हे ही वाचा >>Mumbai Tak Chavdi: "शंभर टक्के वाल्मिक कराडचं नाव 302 मध्ये येईल...", सुरेश धस यांनी दिली खळबळजनक माहिती
नागपूर शहराचे पोलीस उपायुक्त (झोन 5) निकेतन कदम यांनी सांगितलं की, 1 जानेवारी रोजी सकाळी कंट्रोल रूमला फोन आला. कपिल नगर भागातील एका घरात दोन मृतदेह असून, ते रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडून असल्याचं पोलिसांना कळवण्यात आलं. या प्रकरणातील आरोपी हा मृताचा मुलगा असल्याचं प्राथमिक तपासत निष्पन्न झालं. उत्कर्ष डाखोळे या 25 वर्ष वय असलेल्या मुलानेच हे केल्याचं समोर आलं असून, तो इंजिनीअरिंगचा विद्यार्थी आहे.
आरोपीने 26 डिसेंबर रोजीच आपल्या आई-वडिलांची हत्या केली होती. आरोपी मुलाने आधी आईचा गळा दाबून खून केला, नंतर वडिलांचा चाकूने सपासप वार करत खून केला.
हे ही वाचा >>Mumbai Tak Chavdi: "वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई...", सुरेश धस नेमकं काय म्हणाले?
विषय इथेच थांबला नाही, तर आरोपी मुलाने आपल्या बहिणीला एका नातेवाईकाच्या घरी राहायला पाठवलं. आई-वडील ध्यानधारणेसाठी गेले असल्याचं सांगत तिथे मोबाईल वापरता येत नाही असंही तो आपल्या बहिणीला म्हणाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी उत्कर्ष डाखोळे याला अटक केली आहे. तर पोलीस पुढील तपास करत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
