YouTube व्हीडिओ पाहून तरूणाने तयार केला बॉम्ब, निकामी करण्यासाठी घेतली पोलीस ठाण्यात धाव

मुंबई तक

• 07:52 AM • 15 Jun 2021

नागपूर शहरातल्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्य करणाऱ्या राहुल पगाडे नावाच्या एका तरूणाने यूट्युब व्हीडिओ पाहून एक बॉम्बसदृश वस्तू तयार केली. मात्र बॉम्बसदृश वस्तू त्याला निकामी करता येत नव्हती त्यामुळे ती वस्तू घेऊन त्याने नंदनवन पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याने तयार केलेला बॉम्ब त्याला निकामी करता येत नव्हता. त्या बॉम्बसहीत हा तरूण पोलीस ठाण्यात आल्याने […]

Mumbaitak
follow google news

नागपूर शहरातल्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्य करणाऱ्या राहुल पगाडे नावाच्या एका तरूणाने यूट्युब व्हीडिओ पाहून एक बॉम्बसदृश वस्तू तयार केली. मात्र बॉम्बसदृश वस्तू त्याला निकामी करता येत नव्हती त्यामुळे ती वस्तू घेऊन त्याने नंदनवन पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याने तयार केलेला बॉम्ब त्याला निकामी करता येत नव्हता. त्या बॉम्बसहीत हा तरूण पोलीस ठाण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती.

हे वाचलं का?

सुरुवातीला राहुलने बॉम्ब असलेली बॅग आपल्याला बेवारस पडलेली दिसल्याचं नागपूर पोलिसांना सांगितलं. मात्र पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्यानेच तो बॉम्ब यूट्युब बघून तयार केल्याची कबुली दिली. त्यानंतर नंदनवन पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करून तो बॉम्ब निकामी केला आहे. नंदनवन पोलिसांनी या घटनेची सूचना बॉम्ब शोधक पथकाला दिली,तेव्हा बीडीडीएस पथकाने तो गावठी बॉम्बचे इलेक्ट्रिक सर्कीट बॅटरी पासुन वेगळे करून निकामी करण्यात केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरूध्द कलम २८५,२८६ भादवि सहकलम ७,२५ ( १ ) ( क ) भारतीय हत्यार कायदा, सहकलम १२३ मपोका अन्वये गुन्हा नोंदविला आहे .

एका व्यक्तीने बॉम्ब तयार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्या व्यक्तीला लक्षात आलं की बॉम्ब आपल्याला निकामी करता आला नाही. आधी तो तरूण खोटं बोलत होता, मात्र नंतर त्यानेच हा बॉम्ब आपण काही व्हीडिओ पाहून तयार केल्याची कबुली दिली. त्या बॉम्बमध्ये खूप गंभीर स्फोट होईल असे ज्वलनशील पदार्थ नव्हते हे आमच्या बॉम्ब निकामी केल्यावर लक्षात आले. मात्र बॉम्ब जर निकामी केला नसता तर त्या तरूणाच्या बाबतीत दुर्घटना घडू शकली असती असं नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.

लॉकडाऊन असल्याने मी एकटेपणा जाणवत होता त्यातून यूट्युबवर व्हीडिओ पाहात होतो आणि व्हीडिओ पाहता पाहता मला हा व्हीडिओ दिसला जो पाहून मी बॉम्ब तयार केला असं या तरूणाने सांगितलं आहे. सध्या या तरूणाला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

वरीष्ठ पोलीस निरीक्षक एम. डी. शेख यांनी या तरूणाची कसून चौकशी केली असता त्यांना लक्षात आलं की हा तरूण खोटं बोलतो आहे. या तरूणाला त्यांनी खरं काय घडलं ते सांग हे बजावून सांगितलं तेव्हा यू ट्यूब व्हीडिओ पाहून आपणच बॉम्ब बनवला आणि आपल्या हातून वायर तुटली असल्याचं त्याने सांगितलं तसंच बॉम्ब तयार केला पण तो निकामी करता येत नव्हता म्हणून मी बेवारस बॅगमध्ये बॉम्ब मिळाल्याचा बनाव रचला असंही त्याने आम्हाला सांगितलं असंही शेख यांनी म्हटलं आहे. हा बॉम्ब तातडीने निकामी करण्यात आला मात्र या घटनेमुळे खळबळ उडाली होती.

    follow whatsapp