नागपूर शहरात अवैधपणे सुरू असलेल्या हवाला व्यावसायिकांवर पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांनी एकाच वेळी नऊ ठिकाणी धाडी टाकत हवाला व्यावसायिकांची झोप उडवून दिली.
ADVERTISEMENT
नागपूर पोलिसांनी शुक्रवारी रात्री केलेल्या कारवाईत ८४ लाखांची रोकड जप्त केली असल्याची माहिती पुढे आली आहे. त्याचबरोबर 200 लॉकर सील करण्यात आल्याचंही सांगण्यात आलं.
नागपूर : घरगुती वादातून ४ महिन्यांच्या बाळासह पत्नीला चालत्या बाईकवरुन ढकललं
पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या कारवाईत एकाच वेळी नऊ हवाला व्यावसायिकांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश चेंबरसह अन्य ठिकाणी या धाडी टाकण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी अचानक सुरू केलेल्या धाडसत्रामुळे हवाला व्यवसायिकांमध्ये खळबळ माजली आहे. वेगाने विस्तारत चालेल्या नागपूर शहरात शेकडो हवाला व्यावसायिक असून, त्यांच्या मार्फत अवैधरित्या हजारो कोटी रुपयांचा व्यवसाय केला जात असल्याची माहिती पोलिसांना होती.
नागपूर : भाडेकरुच्या जाचाला कंटाळून घरमालकाची आत्महत्या
पोलिसांना या ठिकाणी सुमारे 200 पेक्षा अधिक लॉकर आढळून आले आहेत. याशिवाय पैसे मोजण्याच्या मशिन्स सुद्धा मिळून सापडल्या आहेत. पोलिसांच्या कारवाईनंतर प्राप्तिकर खात्याचे अधिकारी देखील या कारवाईत सहभागी झाले आहेत.
नागपूर हादरलं! मित्रानेच केला घात; 17 वर्षीय मुलीवर सात जणांनी केला बलात्कार
पोलिसांनी हवाला व्यावसायिकांवर कारवाई करत शेकडो लॉकर्स सील केले असून, 84 लाख रुपये जप्त केल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केल्याचं सांगण्यात आलं.
ADVERTISEMENT