ऐकावं ते नवलच! नागपूरमधली काळी इडली ठरतेय चर्चेचा विषय, खवय्यांचीही मिळतेय पसंती

मुंबई तक

• 12:27 PM • 20 Dec 2021

– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी इडली, डोसा, मेदूवडा हे खरं पहायला गेलं तर दक्षिण भारतातले खाद्यपदार्थ म्हणून ओळखले जातात. परंतू वर्षानूवर्ष या खाद्यपदार्थांनी खवय्यांच्या मनावर अशी काही जादू केली आहे की भारताच्या प्रत्येक महत्वाच्या शहरात तुम्हाला हे दाक्षिणात्य पदार्थ पहायला मिळतीलच. यापैकी इडलीमध्ये आतापर्यंत अनेक विविध प्रकार पुढे आले, परंतू नागपूरमधील कुमार रेड्डी यांच्या गाडीवर […]

Mumbaitak
follow google news

– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी

हे वाचलं का?

इडली, डोसा, मेदूवडा हे खरं पहायला गेलं तर दक्षिण भारतातले खाद्यपदार्थ म्हणून ओळखले जातात. परंतू वर्षानूवर्ष या खाद्यपदार्थांनी खवय्यांच्या मनावर अशी काही जादू केली आहे की भारताच्या प्रत्येक महत्वाच्या शहरात तुम्हाला हे दाक्षिणात्य पदार्थ पहायला मिळतीलच. यापैकी इडलीमध्ये आतापर्यंत अनेक विविध प्रकार पुढे आले, परंतू नागपूरमधील कुमार रेड्डी यांच्या गाडीवर मिळणारी काळी इडली सध्या खूपच चर्चेचा विषय ठरली आहे.

पचायला ही इडली हलकी असल्यामुळे केवळ नागपूरकर नाही तर आजुबाजूच्या परिसरातील लोकंही इथे येत आहेत. सिव्हील लाईन भागातील रामगिरी मार्गावर कुमार रेड्डी यांची गाडी सध्या सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे.

कुमार रेड्डी यांना सुरुवातीपासूनच काहीतरी नावीन्यपूर्ण करण्याची इच्छा होती. रेड्डी हे मुळचे दाक्षिणात्य असल्यामुळे त्यांनी हौस म्हणून इडलीचे दुकान सुरू करण्याचा निर्धार केला. सिव्हिल लाईन भागातील रामगिरी या मार्गावर मॉर्निंग वॉक करण्यासाठी येणाऱ्या लोकांची गर्दी असते. त्यामुळे रेड्डी यांनी या भागात आपले छोटेसे दुकान सुरू केले. बघता बघता त्यांच्या दुकानावर अनेकांनी गर्दी करायला सुरुवात केली. इडलीची चवदार वाटत असल्याने अनेकांनी त्यांना इडलीत प्रयोग करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर रेड्डी यांनी पारंपरिक इडलीची चव कायम ठेवत इडलीवर नाविण्यपूर्ण प्रयोग करू लागले.

फळांचा राजा हापूस आंबा वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल, पेटीला ‘हा’ भाव

मित्रांच्या आग्रहावरून तयार केली काळी इडली –

इडली विकतानाच रेडी यांनी इडली सोबत नवनवीन प्रयोग सुरू केले होते. खाण्याचे रंग वापरून त्यांनी अनेक प्रकारच्या इडल्या तयार केल्या, एवढेच काय तर अंडा इडलीचाही प्रयोग त्यांनी केला. मात्र, अंडा इडली लोकांना आवडली नाही. याच दरम्यान रेड्डी यांच्या मित्रांनी काळ्या रंगाची इडली तयार करण्याचा आग्रह धरला. त्यानंतर रेड्डी यांनी माहिती घेत संत्र्याची साल, नारळाचे आवरण यांना वाळवून, भाजून त्याची भुकटी तयार केली. या भुकटीचा वापर रेड्डी नंतर इडली तयार करण्यासाठी करायला सुरुवात केली.

सुरुवातीला रेड्डी यांची ही संकल्पना काही लोकांना आवडली नाही. परंतू हळुहळु खवय्यांना या काळ्या इडलीची चवही आवडायला लागली. त्यामुळे हळुहळु सर्वत्र या इडलीची चर्चा व्हायला लागली. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणारे नागपूरकर हल्ला एकदातरी सिव्हील लाईन भागातील रेड्डी यांच्या गाडीजवळ जाऊन ही काळी इडली खात आहेत. याव्यतिरीक्त रेड्डी यांनी सप्तरंगी इडली हा देखील एक प्रकार आपल्या गाडीवर सुरु केला आहे.

    follow whatsapp