युक्रेन आणि रशियाच्या युद्धात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुखरुप मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. गेल्या काही दिवसांपासून एअर इंडियाच्या विमानांनी युक्रेनमध्ये अडकलेले हे विद्यार्थी आपल्या मायदेशी येत आहेत. तरीही काही विद्यार्थी हे अजुन युक्रेनच्या काही शहरांत अडकले आहेत. यापैकी कर्नाटकातील नवीन या विद्यार्थ्याचा आज रशियन सैन्याने केलेल्या लष्करी कारवाईत मृत्यू झाला. या घटनेनंतर विरोधी पक्षातील काँग्रेसने केंद्र सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही मोदींवर बोचरी टीका करताना, ज्यांना मुलं नाही त्यांना त्यांच्या वेदना काय कळणार असं म्हणत पटोलेंनी नाव न घेता मोदींवर निशाणा साधला आहे. ते गोंदियात पत्रकारांशी बोलत होते.
रशिया-युक्रेन युद्ध: दुतावासाची लोकं विद्यार्थ्यांपर्यंत पोहचली नाही! नवीनच्या वडीलांचा आरोप
मी तिथल्या विद्यार्थ्यांसोबत स्वतः बोललो आहे. मी त्यांच्या संपर्कात होतो. परराष्ट्र मंत्रालयालाही आम्ही याबद्दल कळवलं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत, अनेकांची प्रेत गंगा नदीवर तरंगताना दिसली. त्यावेळी आपल्या प्रधानसेवकांना जाग आली. आता पाच राज्यांच्या निवडणुका आहेत. रशिया एककीडे युक्रेनवर आक्रमणाचे इशारे देत होता. मला काही मुलांनी सांगितलं की बाकीचे देश त्यांच्या विद्यार्थ्यांना घेऊन गेले पण आपल्या देशातली कोणती मदत मिळत नाहीयेत. राजदूतातले अधिकारी फोन उचलत नाहीत.
जेवण आणायला गेला, परत आलाच नाही; नवीनचा मृत्यू नेमका कसा झाला?
आज ज्यांची मुलं तिकडे शिकत आहेत त्यांच्यावर, त्यांच्या परिवारावर काय परिस्थिती ओढावली असेल हे आपण विचार करु शकतो. ज्यांना मुलबाळं नाही त्यांना ते समजणार नाही, असं म्हणत पटोलेंनी नाव न घेता मोदींना आपल्या टीकेचं लक्ष्य केलं.
युद्धभूमीतला संघर्ष जेव्हा आईच्या मिठीत संपतो
केंद्र सरकार आपल्या लोकांना भारतात आणण्यात अपयशी ठरलं आहे हे त्यांनी मान्य करावं. तिकडे अजुनही काही मुलं अडकली आहेत. काही मुलं-मुली बंकरमध्ये आश्रय घेत आहेत. त्यांच्यावर आता काय परिस्थिती ओढावली आहे हे ऐकलं की मन सुन्न होतं. आतातरी आपले प्रधानमंत्री जागे झाले असतील अशी आशा आहे असं नाना पटोलेंनी यावेळी बोलताना म्हटलं
ADVERTISEMENT