नरेंद्र मोदी हे कोरोनासारखे आहेत आणि आम्ही त्यांच्यावर व्हॅक्सिन शोधलं आहे असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांनी पुण्यात केलं आहे. मंगळ ग्रहावर जर इमारत बांधली गेली तर मला तिथे राहुल गांधी फ्लॅट देणार आहेत असं समजू नका. मी नरेंद्र मोदींसारखा फेल झालेलो नाही. काँग्रेस बहुरंगी आहे. ज्या युवकांना देश वाचवायचा असेल त्यांनी काँग्रेसमध्ये यावं असही आवाहन कन्हैय्या कुमार यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT
देश स्वतंत्र केलेल्या लोकांना त्यांनाच देश हित कळत. ज्यांनी एअर इंडिया, BSNL ज्यांनी बनवलं आहे त्यांनाच ते विकताना त्रास होणार आहे. टिव्ही वर काही दाखवलेलं खर नाही. त्यामुळे मोदी सारखे व्यक्तिमत्त्व टिव्ही वर बोलतात ते खोटं आहे. जियो ला मोदी यांनी आणलं, सरकारी रेल्वे, संस्था, विकले गेल तर प्रायव्हेट सेक्टर पण काम करू शकणार नाही.
आणखी काय म्हणाले कन्हैय्या कुमार?
ही लढाई आरपार ची लढाई आहे, डिझेल दरवाढ, गॅस महागाई, शाळेचे अॅडमिशन या सगळ्याचं बाजारीकरण झालं आहे. नरेंद्र मोदी म्हणजे देश नाही, राजकारणाच्या इतिहासावर परिणाम झाला आहे, आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने राज्य चाललं आहे. जो घर सोडून पळून जातो त्याला घराची किंमत कळणार नाही, नेहरूंनी प्रधानमंत्री काळात काम केलं. तुम्ही काय केलं? लोकतंत्र बनवणारे नेहरू आहेत आणि त्यांनाच तुम्ही बदनाम करत आहात अशी टीकाही कन्हैय्या कुमार यांनी केली.
देशाबद्दल काहीही बोललं जातं. मोदींच्या आधीच्या सरकारने लोकातंत्र-लोकशाही जिवंत ठेवली होती. आताच्या सरकारने लोकशाही मारून टाकली. मात्र आम्ही हे कधीही सहन करणार नाही. काँग्रेसने इंग्रजांना हाकलून लावलं तर तुम्ही कोण आहात? किसान बिल बद्दल संसदेत काहीच चर्चा करण्यात आली नव्हती.
…आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोळ्यात आले अश्रू
तीन वर्षापासून कोणतीही रेल्वे भरती नाही, आम्हाला कर सवलती का नाहीत? असे प्रश्न विचारणे गरजेचे आहे. दिल्लीत प्रदूषण वाढले आहे अशा सगळ्या समस्या गोष्टीनं संसदेतील चर्चेतून गाळून टाकले. काँग्रेस सगळ्यांना समसमान वागणूक देणारा पक्ष आहे. संविधान वाचवले तर लोकशाही वाचेल आणि हे फक्त लोक निवणुकीतून वाचवतील असा मला विश्वास वाटतो.
बिपिन रावत यांच्या निधनाच्या दुःखद घटनेमुळे सोनिया गांधी आपला वाढदिवस साजरा करणार नाहीत, तसेच देशाच्या प्रमुख पदावरील अधिकाऱ्याच्या निधनामुळे कोणतेही सेलिब्रेशन करणार नाहीत. परंतु लोकशाही बचाव सभा आधीच पूर्वनियोजित असल्याने या सभेचे आयोजन करण्यात आले. पूर्वी भाजप राजवटीत पुण्यात आलो तेव्हा खूप सिक्युरिटी होती पण आज या मोकळ्या वातावरात मनमोकळ्या गप्पा मारतो आहे असाही टोला लगावण्यात आला आहे.
ADVERTISEMENT