Satyajeet Tambe : नाशिक पदवीधर निवडणुकीत BJP कुणाच्या पाठिशी? काय ठरलं?

भागवत हिरेकर

28 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:11 AM)

Satyajeet Tambe। nashik graduate constituency election 2023 । Maharashtra BJP : विधान परिषदेच्या (MLC Election 2023) पाच जागांसाठी निवडणूक होत असून, नाशिक पदवीधर मतदारसंघात (nashik graduate constituency) काय घडलंय? आणि त्यामुळे काँग्रेस (Congress) आणि महाविकास आघाडीतील (MahaVikas aghadi) राजकारण कसं ढवळून निघालं, हे सगळ्यांनीच पाहिलं. मात्र, या सगळ्यात सर्वांच्या नजरा आहेत, त्या भाजपकडे (BJP). अपक्ष […]

Mumbaitak
follow google news

Satyajeet Tambe। nashik graduate constituency election 2023 । Maharashtra BJP : विधान परिषदेच्या (MLC Election 2023) पाच जागांसाठी निवडणूक होत असून, नाशिक पदवीधर मतदारसंघात (nashik graduate constituency) काय घडलंय? आणि त्यामुळे काँग्रेस (Congress) आणि महाविकास आघाडीतील (MahaVikas aghadi) राजकारण कसं ढवळून निघालं, हे सगळ्यांनीच पाहिलं. मात्र, या सगळ्यात सर्वांच्या नजरा आहेत, त्या भाजपकडे (BJP). अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या सत्यजित तांबेंनी (Satyajeet Tambe) ना भाजपला पाठिंबा मागितलाय. ना भाजपने सत्यजित तांबेंना जाहीरपणे पाठिंबा दिलाय. मात्र, नेत्यांच्या विधानांतून भाजप नेमकं कुणाच्या बाजूने असणार आहेत, याचे संकेत मिळाले आहेत.

हे वाचलं का?

नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसनं सत्यजित तांबे यांचे वडील सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली, पण त्यानी अर्ज भरलाच नाही. त्यांच्याऐवजी सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. महत्त्वाचं म्हणजे इतर चारही मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या भाजपनं नाशिकमधून मात्र कुणाला उमेदवारी दिली नाही आणि अजून पाठिंबाही जाहीर केलेला नाही. त्यामुळे उत्सुकता वाढलीये.

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक : सत्यजित तांबेंना कुणाचं बळ?

पक्षाच्या विरोधात जाऊन अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या सत्यजित तांबेंच्या विरोधात शुभांगी पाटील निवडणूक लढवत आहेत. सुधीर तांबेंनी अर्ज न भरल्यानं मविआने जागांची अदलाबदल केली आणि नाशिकची जागा शिवसेनेकडे आली. शिवसेनेनं अपक्ष अर्ज दाखल केलेल्या शुभांगी पाटलांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे शुभांगी पाटलांना आता अधिकृतपणे महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळाला आहे.

विधान परिषद: पदवधीर, शिक्षकांनो तुमचं मतदान असतं फारच वेगळं, थोडं समजून घ्या!

अशात निवडणूक न लढवणारी भाजप, नाशिक मतदारसंघात कुणाच्या पाठिशी राहणार, याकडे सगळ्याचं लक्ष आहे. त्यात सत्यजित तांबेंनी मांडलेल्या भूमिकेतून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होताना दिसत आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक : सत्यजित तांबे काय म्हणाले ते वाचा?

अहमदनगर शहरात प्रचारार्थ घेतलेल्या पदवीधर मेळाव्यात सत्यजित तांबे म्हणाले, “”डॉ. सुधीर तांबे यांनी गेल्या पंधरा वर्षात मतदारांशी जो ऋणानुबंध वाढवला, त्याच्या जोरावर आम्ही ही निवडणूक लढवत आहोत.”

यावेळी मामांचा पाठिंबा (बाळासाहेब थोरात) आहे का?, असं पत्रकरांनी विचारलं. त्यावर सत्यजित तांबे म्हणाले, “ते आमचे कुटुंब प्रमुख आहेत आणि आम्ही एका परिवारातील आहोत.” ‘सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्याबाबत भाजपच्या नेत्यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत,” असा प्रश्न तांबे यांना विचारण्यात आला.

Sumitra Mahajan: कोश्यारी जाणार, मराठी माणूस राज्यपाल होणार?

त्यावर तांबे म्हणाले, “तुम्ही तसा लेखी आदेश पाहिला आहे का?”, पुढे ते म्हणाले, “मी कुणालाही संपर्क केला नाही वा मला कुणीही संपर्क केला नाही. सर्वच पक्षाच्या कार्यकर्ते आमच्याशी संबंध चांगले आहेत, त्यामुळे सर्वच आम्हाला मदत करत आहेत.”

भाजपच्या भूमिकेबद्दल सुजय विखे पाटील काय म्हणाले?

“जिल्ह्यामधून जर कुणी चांगला उमेदवार असेल, तर जिल्ह्यातील लोकांची ही भावना असते की, त्या उमेदवाराला आपण पुढाकार दिला पाहिजे. दुसऱ्या जिल्ह्याच्या उमेदवाराला आपण का पाठिंबा द्यायचा? अशी भावना माझ्याकडे काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. त्यावर आम्ही वरिष्ठ पातळीवर चर्चा करत आहोत. जर पक्षाने असा आदेश दिला की, स्थानिक पातळीवर निर्णय घ्या, तर आम्हाला असं वाटतं की, कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत जिल्हापातळीवर जिल्ह्याला एखादी संधी मिळत असेल, तर जिल्ह्यातील लोक त्या संधींचं सोनं करण्याचा प्रयत्न करतील.

Santosh Bangar: अखेर ‘त्या’ प्रकरणात आमदार बांगरांविरोधात गुन्हा दाखल

सत्यजित तांबे म्हणाले, “सर्वच पक्षाच्या कार्यकर्ते आमच्याशी संबंध चांगले आहेत, त्यामुळे सर्वच आम्हाला मदत करत आहेत.” तर दुसरीकडे सुजय विखे पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील उमेदवाराच्या पाठिशी उभं राहण्याची भूमिका कार्यकर्त्यांची असल्याचं म्हणत सुजय विखे पाटील यांनी अप्रत्यक्षपणे भाजप सत्यजित तांबे यांच्याबद्दल अनुकूल असल्याचेच संकेत दिले आहेत. कारण शुभांगी पाटील या नाशिक जिल्ह्यातील आहेत. तर तांबे हे नगर जिल्ह्यातील आहेत.

मतदानासंदर्भात स्थानिक नेत्यांनी निर्णय घेण्याबद्दल सूचना केलेल्या आहेत. सत्यजित तांबेंनी स्पष्टपणे म्हटलंय की, सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांशी आमच्याशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे सगळेच आम्हाला मदत करत आहेत. सत्यजित तांबे यांच्या सर्वच पक्षांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचाही समावेश आहेत. नाशिकच्या निवडणूक राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका महत्त्वाचीच आहे. त्याचमुळे सुजय विखे पाटील यांनी केलेल्या विधानातून भाजप नेमकं कुणाच्या पाठिशी असणार याबद्दल संकेत मिळत आहेत.

    follow whatsapp