पुणे: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे (sumitra bhave) यांचं आज (19 एप्रिल, सोमवार) सकाळी पुण्यात निधन झालं. त्या 78 वर्षांच्या होत्या. मागील काही दिवसांपासून फुफ्फुसाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे मागील 15 दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र आज त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
ADVERTISEMENT
‘लेखक-दिग्दर्शक, सामाजिक कार्यकर्त्या सुमित्रा भावे यांचं आज सकाळी सव्वासात वाजता पुण्याच्या सह्याद्री रुग्णालयात निधन झालं. त्या गेले दोन महिने फुफ्फुसांच्या विकाराने त्रस्त होत्या. सध्या कोव्हिडची परिस्थिती बघता आणि एरवी देखील अशा प्रसंगी गर्दी असू नये हे सुमित्रा भावे यांचं मत लक्षात घेता थोड्याच वेळात वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.’ अशी माहिती चिन्मय दामले यांनी दिली आहे.
जाणून घ्या सुमित्रा भावे यांच्या कारकीर्दीविषयी:
सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांच्यासह अनेक उत्तमोत्तम मराठी चित्रपटांची निर्मिती केली. ‘बाई’, ‘पाणी’ या सुरुवातीच्या लघुपटांना लोकप्रियता मिळाल्यानंतर त्यांनी १९९५ मध्ये ‘दोघी’ हा पहिला चित्रपट तयार केला होता. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शित केलेले ‘दहावी फ’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘बाधा’, ‘नितळ’, ‘एक कप च्या’, ‘घो मला असला हवा’, ‘कासव’, ‘अस्तु’ हे चित्रपट गाजले. त्यांचे चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत नावाजले गेले.
सच्चा कलाकार हरपला, ‘कोर्ट’ सिनेमातील अभिनेते वीरा साथीदार यांचं कोरोनाने निधन
त्यांच्या अनेक चित्रपटांना राज्य व राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. ‘विचित्र निर्मिती’ या बॅनरखाली तयार झालेल्या, विविध सामाजिक प्रश्न हाताळणाऱ्या त्यांच्या चित्रपटांचा चाहतावर्ग मोठा आहे. सोनाली कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, सचिन खेडेकर अशा अनेक कलाकारांना सुमित्रा भावे यांच्याकडे सिनेमाचे धडे गिरवता आले.
कामगार चळवळीचा बुलंद आवाज शांत! दत्ता इस्वलकर यांचं निधन
सुमित्रा भावे यांचा जन्म 12 जानेवारी 1943 मध्ये पुण्यात झाला होता. फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी मिळविल्यानंतर मुंबईतील टाटा समाजविज्ञान संस्थेतून त्यांनी ग्रामीण विकास या विषयात पदविका मिळविली. पूर्ण वेळ समाजशास्त्रज्ञ म्हणून काम करायचे ठरविल्यानंतर सुमित्रा भावे अपघातानेच लघुपटाकडे वळल्या. मात्र, या माध्यमाची ताकद लक्षात आल्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ चित्रपट निर्मितीत उतरण्याचा निर्णय घेतला. (national award winning senior direnctor sumitra bhave passes away)
ADVERTISEMENT