नवी मुंबईत एक हृदयद्रावक घटना समोर आली घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्याच अल्पवयीन बहिणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचं समजतंय. या व्यक्तीला अटक करण्यात आली असून, आपल्या 17 वर्षांच्या बहिणीचे एका व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
ADVERTISEMENT
नवी मुंबईतील एपीएसी मार्केट परिसरात राहणाऱ्या दोघांमध्ये एका विषयावरुन वाद झाला. आपल्या बहिणीचे एका व्यक्तिशी प्रेमसंबंध असल्याचा संशय भावाला होता. त्याला ते संबंध पटत नव्हते. आपल्या बहिणीचा त्याला यामुळे खूप राग यायचा. यावरुन दोघांमध्ये वाद झाल्याचीही माहिती आहे.
हे ही वाचा >>Santosh Deshmukh Case : केज, नांदेड ते पुण्यातील बालेवाडी... सुदर्शन घुले, सुधीर सांगळे कसे सापडले? डॉ. वायबसेंचा रोल काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी संध्याकाळी एपीएमसी मार्केट परिसरात ही घटना घडली. आरोपीला त्याच्या बहिणीचे एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. त्यानं बहिणीला बोलावलं, तिच्यावर पेट्रोल टाकलं आणि तिच्या गळ्यावर चाकू ठेवला आणि सिगारेट लायटरने तिला जाळण्याची धमकी दिली.
हे ही वाचा >>Sudarshan Ghule Arrested : संतोष देशमुख प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला SIT कडून अटक
भाऊ आपल्याला जिवंत जाळणार असल्याचं लक्षात येताच, ती मुलगी तिथून कशीबशी सुटली आणि थेट पोलीस स्टेशनला गेली. पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम 109 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
