नवी मुंबई: नेरूळ रेल्वे स्टेशनच्या बाजूला राहणारे दाम्पत्य मुलांना जन्म देऊन ती मुले विकत असल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार महिला बालविकास विभाग ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी उघडकीस आणले आहे.
ADVERTISEMENT
या घटनेची माहिती मिळताच महिला बालविकास विभाग आणि नवी मुंबई पोलीस आरोपींना पकडण्यासाठी गेले असता आईला ताब्यात घेतले आहे. मात्र बाप फरार झाला आहे. पोलिसांनी आरोपी आईची कसून चौकशी केली असता पहिली मुलगी त्यांनी 90 हजार, दुसरी 2 लाख रुपयांना विकली. तर तिसरा मुलगा कोणाला विकला याची माहिती पोलिस घेत आहेत.
दरम्यान, दोन मुलांचा शोध लागला असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर तिसऱ्या मुलाचा शोध सुरू असून फरार बापालाही शोधण्यासाठी पथक रवाना झाले असल्याचे उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले तर या घटनेत मुख्य कामगिरी बजावणाऱ्या महिला बाल विकास मंडळाच्या पल्लवी जाधव यांनी या मुलांच्या विक्रीची माहिती दिली आहे.
देहविक्रीसाठी आईने 5 वर्षाच्या मुलीला विकलं
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच एका आईने आपल्या पाच वर्षांच्या मुलीला चक्क देहविक्रीसाठी विकल्याची अत्यंत धक्कादायक घटना अमेरिकेतील जॉर्जियामध्ये घडली होती. सगळ्यात खळबळजनक बाब म्हणजे महिलेकडून मुलगी विकत घेणाऱ्या व्यक्तीने मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या देखील केली होती. ज्यानंतर मृत मुलीची आई क्रिस्टी सिपलला अटक करण्यात आली होती. तिच्यावर मानवी तस्करी आणि हत्येचा आरोप निश्चित करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘क्रिस्टी सिपल हिने आपल्या मुलीला एका व्यक्तीला अवघ्या काही रुपयांसाठी विकलं होतं. पीडित मुलीचा मृतदेह अलाबामाच्या फिनिक्स शहरात असलेल्या एका निर्जन घरात आढळून आला होता. हीच मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार काही वेळापूर्वी दाखल करण्यात आली होती.
अटक होण्याआधी, क्रिस्टीने WTVM-TV ला सांगितले की तिच्या मुलगी बेपत्ता आणि हत्येत तिचा कोणताही सहभाग नाही. ती म्हणाली, ‘मी आई आहे. मी असे काहीही केलेले नाही. ती माझं आयुष्य होतं आणि मी तिच्यासाठीच जगत होते. मला तीन मुलं आहेत. पण तरीही माझं माझ्या मुलीवर खूप प्रेम होतं.’ असं ती म्हणाली होती. मात्र, आता सध्या ती तुरुंगात खितपत पडली आहे.
पुण्यात 85 वर्षांच्या वडिलांची चाकूचे वार आणि डोक्यात वरंवटा घालून हत्या, मुलाला पोलिसांनी घेतलं ताब्यात
ADVERTISEMENT