Navneet Rana Latest News: अपक्ष खासदार नवनीत राणा आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावर सध्या सुनावणी सुरू आहे. मुंबईच्या सेशन्स कोर्टातल्या एपी-एएमएलए कोर्टात सुनावणी सुरू आहे. राणा दाम्पत्याचे ज्येष्ठ वकील रिझवान मर्चंट आणि आबाद पोंडा यांनी कोर्टात युक्तीवाद केला. शुक्रवारी सुनावणी दरम्यान पोलिसांनी एक प्रतिज्ञापत्र दाखल करत राणा दाम्पत्याच्या जामिनाला विरोध केला होता.
ADVERTISEMENT
आता नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांच्याही जामिनावर सोमवारी फैसला होणार आहे. या दोघांच्याही जामिनावर जी सुनावणी झाली त्यामध्ये दोन्ही पक्षांच्या वकिलांनी सुमारे अडीच तास युक्तिवाद केला.
राणा दाम्पत्याचा वकिलांनी सुनावणी दरम्यान सांगितलं की हे प्रकरण विना मुद्द्याचं आहे. राणा दाम्पत्य हे दोघंही निवडून आलेले नेते आहेत. ते कुठेही पळून जाणार नाहीत त्यामुळे त्यांचं स्वातंत्र्य त्यांच्याकडून हिरावून घेतलं जाऊ नये. पोलिसांनी त्यांच्या जामिनाला विरोध केला आहे, मात्र कस्टडी मागितलेली नाही. त्यामुळे अजूनही दोघंही न्यायालयीन कोठडीत आहेत. या दोघांना ८ वर्षांची मुलगी आहे. या दोघांना सशर्त जामीन मिळू शकतो, जामिनावर त्यांना सोडलं पाहिजे.
याशिवाय वकिलांनी काही तर्कही समोर ठेवले. राणा दाम्पत्य मातोश्रीला गेले होते. त्यांच्यासोबत कुठलेही कार्यकर्तेही नव्हते. हिंसा करण्याचा त्यांचा कोणताही उद्देश नव्हता. इतकं सगळं असून हे आंदोलन सरकारच्या विरोधात आहे असं सांगितलं. सरकारचे समर्थक विरोधी आंदोलन करत होते. राणा दाम्पत्याने जे केलं त्यात देशद्रोहाचं कलम लावण्यासारखं काहीही नाही असंही वकिलांनी सांगितलं.
मात्र सरकारतर्फे या दोघांच्याही जामिनाला विरोध दर्शवला जातो आहे. राणा दाम्पत्याने पोलिसांच्या आदेशाचं पालन केलं नाही. त्यांना यासंदर्भातली माहिती देण्यात आली होती की मातोश्री समोर जाल तर तिथे कायदा आणि सुव्यसेथाचा प्रश्न निर्माण होईल. जर एखादा माणूस नियम पाळणारा असता तर त्यांनी आपला निर्णय बदलला असता. मात्र या लोकांनी संविधानात दिलेल्या अधिकारांचं उल्लंघन करण्यात आलं आहे.
नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांनीही उद्धव ठाकरेंच्या घरासमोर म्हणजेच मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर गुरूवार आणि शुक्रवारच्या दिवशी मातोश्री बाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली होती. एवढंच नाही शिवसैनिकांनी राणे दाम्पत्याच्या घराबाहेरही घोषमा दिल्या होत्या. शिवसैनिकांनी राणा दाम्पत्यावर धार्मिक भावना दुखावल्याची केसही केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्यावर राजद्रोहाचंही कलम लावण्यात आलं होतं.
ADVERTISEMENT