Navya Nanda: अमिताभ बच्चन यांच्या नातीचं झोपडपट्टीत काम, फोटो आले समोर

मुंबई तक

• 09:40 PM • 13 Mar 2023

नव्या नवेली नंदा ही अशी एक स्टार किड आहे, जी बॉलीवूड लाइमलाइटच्या जगापासून दूर आहे. ती एक बिझनेसवुमन म्हणून आपला ठसा उमटवत आहे. नव्या नंदा लक्झरी लाईफस्टाईल सोडून नेहमी कोणत्या ना कोणत्या मुद्द्यांवर आपलं मत मांडत काम करताना दिसते. यावेळीही असचं काहीसं घडलं, नव्याने सुट्टीच्या दिवशी काहीतरी खास करण्याचं ठरवलं. यासाठी ती थेट मुंबईच्या झोपडपट्टी […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

नव्या नवेली नंदा ही अशी एक स्टार किड आहे, जी बॉलीवूड लाइमलाइटच्या जगापासून दूर आहे. ती एक बिझनेसवुमन म्हणून आपला ठसा उमटवत आहे.

नव्या नंदा लक्झरी लाईफस्टाईल सोडून नेहमी कोणत्या ना कोणत्या मुद्द्यांवर आपलं मत मांडत काम करताना दिसते.

यावेळीही असचं काहीसं घडलं, नव्याने सुट्टीच्या दिवशी काहीतरी खास करण्याचं ठरवलं. यासाठी ती थेट मुंबईच्या झोपडपट्टी भागात पोहोचली.

‘न्यारी नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन’सोबत नव्याने तेथील उपक्रमात सहभाग घेतला.

याठिकाणी भिंतींवर महिलांचे हक्क आणि सशक्त व्यक्तिमत्त्व दर्शवणारी चित्रं तिने आणि तिच्या टीमने रेखाटली.

नव्याने तिथे मुलांसोबत बराच वेळ घालवला. त्यांच्यासोबत फोटो क्लिक केले.

नव्याचा हा अंदाज पाहून आजोबा अमिताभ बच्चन आणि आई श्वेता बच्चन यांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं.

त्याचवेळी चाहत्यांनाही नव्याचा हा पुढाकार चांगलाच भावला. सर्वांनी तिचं कौतुक केलं.

काही यूजर्स म्हणाले, ‘ही एकमेव स्टारकिड आहे, जी स्वतः काहीतरी करत आहे. इतकं नम्र असणं सोपं नाही.’

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

    follow whatsapp