राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली, जे जे रूग्णालयात दाखल

दिव्येश सिंह

• 09:50 AM • 25 Feb 2022

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतल्या जे. जे. रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नवाब मलिक यांच्या घरी पोहचत बुधवारी ईडीने त्यांना सोबत घेतलं. आठ तास त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. नवाब मलिक यांच्या घरी ईडीने सकाळीच धाड टाकली होती. नवाब मलिक […]

Mumbaitak
follow google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतल्या जे. जे. रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नवाब मलिक यांच्या घरी पोहचत बुधवारी ईडीने त्यांना सोबत घेतलं. आठ तास त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. नवाब मलिक यांच्या घरी ईडीने सकाळीच धाड टाकली होती.

हे वाचलं का?

नवाब मलिक यांना समर्थन देण्यासाठी महाविकास आघाडीने गुरूवारी मंत्रालयाजवळ आंदोलनही केलं. नवाब मलिक यांना 3 मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. टेरर फंडिंग, बॉम्बस्फोटातील आरोपीकडून जमीन घेणं हे आणि असे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. आज नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना जे. जे. रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

क्रोनोलॉजी समझिये… पाहा आर्यन खानसाठी पुढे सरसावलेले नवाब मलिक कसे सापडले ईडीच्या जाळ्यात!

दाऊद इब्राहीम टोळी क्रिकेटवरील सट्टेबाजी आणि बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करत असल्याच्या आरोपावरून ‘ईडी’ने दाऊद आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ‘ईडी’ने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केली़ दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे ‘ईडी’ला तपासात आढळले. त्यानुसार ‘ईडी’ने बुधवारी ही कारवाई केली.

22 फेब्रुवारीला पहाटेच कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या घरी ईडीचं पथक पोहचलं. ज्यांनी जवळजवळ दोन तास घरातच त्यांची चौकशी केली होती. त्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात नेलं आणि दुपारी तीन वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली. आता या सगळ्यात असा दावा केला जात आहे की, इक्बाल कासकरने दिलेल्या काही माहितीच्या आधारेच नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. मागच्या काही तासांपासून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली होती. आता अखेर त्यांना अटक केली आहे. नवाब मलिक यांनी 1993 स्फोटातील आरोपीकडून कुर्ला भागात एक मालमत्ता खरेदी केली होती. कोट्यवधींची किंमत असलेली ही मालमत्ता नवाब मलिकांनी अवघ्या 30 लाखांत खरेदी केली होती. असा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी 9 नोव्हेंबर 2021 रोजी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत केला होता. या जमीन खरेदीत मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप करण्यात आला होता. याच प्रकरणी चौकशी केल्यानंतर आता नवाब मलिक यांना अटक करण्यात आली. आता प्रकृती बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

    follow whatsapp