मुंबई: ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) बनावट कारवाया करंत या माझ्या मतावर मी आजही कायम आहे.’ असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा केला आहे. मुंबईतील आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आपल्या जावयाला कशाप्रकारे अडकवलं गेलं याचा घटनाक्रमच त्यांनी सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
‘सुरुवातीला असं सांगण्यात आलं की, माझ्या जावयाकडे 200 किलो गांजा सापडला पण तो गांजा नव्हता तर ते हर्बल टोबॅको (तंबाखू) होतं. असं कोर्टाच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.’ असं म्हणत नवाब मलिक यांनी या प्रकरणात NCB वर अनेक आरोप केले आहेत.
या प्रकरणात फक्त साडेसात ग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे तो त्यांना फर्निचरवालाकडे सापडला होता. बाकी संपूर्ण गोष्टी या हर्बल टोबॅको आहे असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. प्रश्न हा आहे की, एवढी मोठी एजन्सी NCB यांना तंबाखू आणि गांजा यातील फरक समजत नाही याबाबत खरंच आश्चर्य वाटतं. माझ्या माहितीनुसार, याप्रकरच्या केसेसमध्ये ज्या एजन्सी काम करतात त्यांच्याकडे इन्सटंट टेस्टिंग किट असतं. त्यामुळे त्यांना समजतं की, आपण जप्त केलेले पदार्थ हे अंमली पदार्थ आहेत की नाही.
नवाब मलिकांनी जावयाच्या अटकेप्रकरणी सांगितलेला संपूर्ण घटनाक्रम
‘9 जानेवारीला माझ्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यामुळे संपूर्ण कुटुंबीय आम्ही एकत्र बाहेर जेवणासाठी जातो. त्यानंतर 13 तारखेला सकाळी पावणे दहा वाजता मला एका पत्रकाराचा फोन आला की, तुमच्या जावयाला NCB ने समन्स बजावलं आहे का? काही ड्रग्स प्रकरणी. मी त्यांना म्हटलं की, त्याला का समन्स बजावतील. हे चुकीचं आहे. जर असं काही असेल तर प्रकरण गंभीर असू शकतं.’
’12 तारखेला रात्री NCB ने समन्स दिलं ते समीर खान यांच्या आई ज्या बाजूच्या कोणत्या तरी इमारतीत राहतात तिथे. रात्री साडेदहा वाजता हे समन्स माझ्या जावयाला मिळालं. त्यात त्यांना 13 तारखेला दहा वाजता कार्यालयात हजर राहण्यासा सांगण्यात आलं होतं. 13 तारखेला ते पावणे दहा वाजताच तिथे हजर झाले होते.’
‘दरम्यान, संध्याकाळी एक बातमी आली. पुन्हा त्याच नंबरवरुन लोकांना बातमी देण्यायत आली की, 27 a मध्ये समीर खान हा ड्रग पेडलर आहे. मोठं रॅकेट चालवतो. ड्रग्स इम्पोर्ट करतो. त्यामुळे त्याला 27 a अंतर्गत अटक करण्यात आली आहे.’
‘दुसरीकडे 14 तारखेला माझ्या जावयाच्या घरी एनसीबीचे लोकं हे सर्चसाठी गेले होते. माझ्या मुलीच्या पायाला लागलं होतं. त्यामुळे ती माझ्याच घरी थांबली होती. त्यावेळी तिला फोन आला की, काही लोकं हे त्यांचं घर तपासण्यासाठी आले आहेत.’
‘त्यामुळे माझी मुलगी तिकडे गेली. दुपारी दोन-तीन वाजेपर्यंत सर्च सुरुच होतं. सगळ्या चॅनलवर हेच दाखवत होते की, गांजा मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आला आहे. पण घरात अशाप्रकारची कोणतीही गोष्ट सापडली नाही. पण तरीही तशा प्रकारच्या बातम्या पत्रकारांना सांगण्यात आल्या.’
‘दुसरीकडे चौकशीला गेलेल्या माझ्या जावयला अटक करण्यात आली. त्यामुळे त्याला जेल कस्टडी झाली. त्यानंतर आम्ही जामीनासाठी अर्ज केला. याचिका फेटाळाली त्यामुळे आम्ही हायकोर्टात गेलो. अटकेला जेव्हा सहा महिने पूर्ण झाले तेव्हा सुनावणी सुरु झाली. त्यावेळी NCB ने सांगितलं की, आम्ही 7 तारखेला चार्जशीट फाइल करु. त्यावेळी हायकोर्टाने आम्हाला सांगितलं की, कनिष्ठ न्यायालयात जा.’
‘माझ्या जावयाकडे गांजा सापडला नाही, ती तंबाखू होती.. NCB ला फरक समजतो की नाही’, नवाब मलिकांचा सवाल
‘साडेतीन महिने एनसीबीने टाळाटाळ केली. त्यामुळे या सुनावणीला साडेतीन महिने लागले. यावेळी NCB ने भरपूर प्रयत्न केला की, जेवढा वेळ आपल्याला ही सुनावणी लांबवता येईल तेवढी लांबवायची. पण अखेर जावयाचा जामीन मंजूर झालाच.’ असा संपूर्ण घटनाक्रम त्यांनी यावेळी सांगितला.
ADVERTISEMENT